100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत मोठी अपडेट समोर, RBI नं बँकांना दिल्या महत्वाच्या सूचना
आरबीआय बातम्या: भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सोमवारी बँकांना एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा ठेवण्यास सांगितले आहेत. लोकांना छोट्या व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येऊ नये यासाठी RBI बँकांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळं ग्राहकांना एटीएममध्ये (ATM) आता 100 आणि 200 रुपयांच्या नोटा देखील मोठ्या प्रमाणात उपल्बध होतील.
दरम्यान, जेव्हा लोक एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी जातात तेव्हा बहुतेकदा असे घडते की लोकांना फक्त 500 रुपयांच्या नोटा काढता येतात. 500 रुपयांच्या नोटा मिळाल्यानंतर अनेकदा लोकांना पैसे सुट्टे करण्यासाठी भटकंती करावी लागते. पण आता लोकांच्या समस्या कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) सोमवारी बँकांना एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांचे वितरण सुनिश्चित करण्यास सांगितले.
छोट्या व्यवहारात लोकांना कोणतीही अडचण येऊ नये – RBI
लोकांपर्यंत या नोटांची उपलब्धता वाढवण्यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे. बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAOs) यांना टप्प्याटप्प्याने या निर्देशाची अंमलबजावणी करावी लागेल. नॉन-बँकिंग संस्थांद्वारे चालवल्या जाणाऱ्या एटीएमना ‘व्हाइट लेबल एटीएम’ (WLA) म्हणतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने एका परिपत्रकात म्हटले आहे की, वारंवार वापरल्या जाणाऱ्या मूल्याच्या बँक नोटांपर्यंत सार्वजनिक प्रवेश वाढवण्यासाठी, सर्व बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर (WLAO) त्यांच्या एटीएममध्ये नियमितपणे 100 आणि 200 रुपयांच्या नोटा वितरीत केल्या जातील याची खात्री करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
100, 200 रुपयांच्या नोटांना मोठी मागणी
परिपत्रकानुसार, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत, 75 टक्के एटीएम (ऑटोमेटेड टेलर मशीन्स) किमान एका कॅसेटमधून 100 किंवा 200 रुपयांच्या बँक नोटा वितरीत करू शकतील. यानंतर, 31 मार्च 2026 पर्यंत, 90 टक्के एटीएमने किमान एका कॅसेटमधून 100 किंवा 200 रुपयांच्या बँक नोटा वितरित केल्या पाहिजेत. आरबीआयने बँकांना एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांची उपलब्धता वाढवण्यास सांगितले आहे. हा आदेश बँका आणि व्हाईट लेबल एटीएम ऑपरेटर्स (WLAO) या दोघांनीही पद्धतशीरपणे लागू करावा लागेल. या आदेशानंतर देशातील बँका आणि अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. या आदेशानंतर एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटांबाबत बँकांना अधिक कसरत करावी लागणार आहे. कधी कधी एटीएममध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा उपबल्ध होत नाहीत. त्यामुळं लोकांना अडचणींचा सामना करावा लागl Eus..
महत्वाच्या बातम्या:
ATM charge News : 1 मेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार, एकदा पैसे काढल्यास किती चार्ज लागणार?
अधिक पाहा..
Comments are closed.