आरबीएल बँकेची मालकी दुबईच्या कंपनीकडे जाणार, 26853 कोटी रुपयांची डील, 60 टक्के भागीदारी घेणार

मुंबई : देशातील खासगी बँकिंग क्षेत्रात येत्या काळात एक मोठी डील होणार आहे. आरबीएल बँकेनं 17 ऑक्टोबरला एक मोठी घोषणा केली आहे. एमिरेटस एनबीडी आरबीएल बँकेची 60 टक्के भागीदारी खरेदी करणार आहे. यासंदर्भातील एक करार झाला आहे. एमिरेटस एनबीडी मध्य पूर्व आशियातील मोठा बँकिंग समुह आहे.

एमिरेटस एनबीडी डीलनुसार बँकेचा एक शेअर 280 रुपये प्रतिशेअर प्रमाणं खरेदी करेल.  यासाठी एमिरेटस एनबीडी 26853 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. हा प्रेफरेन्शिअल इश्यू पूर्ण होताच एमिरेटस एनबीडीला आरबीएल बँकेवर नियंत्रण मिळेल आणि ते बँकेचे प्रमोटर बनतील.

हा व्यवहार देशातील बँकिंग क्षेत्रातील मोठी विदेशी गुंतवणूक म्हणून पाहिलं जात आहे. मात्र, हा व्यवहार पूर्ण होण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, शेअर धारक आणि नियामक संस्थांची मंजुरी आवश्यक असेल.

आरबीएल बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सकडून या गुंतवणुकीसाठी बँकेची शेअरचं भांडवल 1000 कोटींवरुन 1800 कोटी रुपये करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळं एमिरेटस एनबीडीला नवे शेअर जारी करण्याचा मार्ग मोकळा होईल.

आरबीएल बँक आणि एमिरेटस एनबीडी यांच्यातील  हा व्यवहार विदेशी गुंतवणुकीच्या अधिक भागीदारीच्या 24 टक्के मर्यादेच्या अधीन असेल. जोपर्यंत नियमाकांच्या मंजुऱ्या मिळत नाहीत तोपर्यंत बँकेनं आरबीआय आणि इतर संस्थांची परवानगी मिळवण्यासाठी अर्ज करण्याचा  निर्णय घेतला आहे.

आरबीएल बँकेनं या व्यवहाराला शेअरधारकांची मान्यता मिळवण्यासाठी 12 नोव्हेंबरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलावली आहे. बँकेच्या अपेक्षेनुसार सर्व नियमाकांच्या आणि शेअर धारकांच्या परवानगीनंतर 1 एप्रिल 2026 पासून हा करार लागू होईल. आरबीएल बँकेचा शेअर शुक्रवारी 17 ऑक्टोबरला एनएसईवर 299.70 रुपयांवर पोहोचला होता.

येथे प्रकाशित : 18 ऑक्टोबर 2025 09:18 PM (IST)

Comments are closed.