गतविजेत्या बंगळुरूने फोडला विजयाचा नारळ, पहिल्याच सामन्यात हैदराबादचा फडशा पडला, Point Table मध
RCB vs SRH IPL 2026 1ला सामना अपडेट : आयपीएल 2026 (IPL 2026) हंगामाची सुरुवात अतिशय धमाकेदार झाली. शनिवार (28 मार्च) रोजी झालेल्या पहिल्याच सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने सनरायझर्स हैदराबाद (SRH) वर शानदार विजय मिळवला. बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात आरसीबीने 6 विकेट्स राखून सहज विजय मिळवत हंगामाची विजयी सुरुवात केली. या विजयासह त्यांनी पॉइंट्स टेबलमध्ये (Points Table) आपले खाते उघडत 2 गुणांची कमाई केली. या विजयामुळे गतविजेत्या आरसीबीने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवून दिली असून, यंदाच्या हंगामात ते पुन्हा विजेतेपदासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 202 धावांचे लक्ष्य ठेवले, जे आरसीबीने 16 व्या षटकात पूर्ण केले आणि 6 गडी राखून सामना जिंकला.
सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खराब…
आरसीबीविरुद्ध नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सनरायझर्स हैदराबादची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. त्यांनी 29 धावांत तीन गडी गमावले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जेकब डफी, जो आपला पदार्पणाचा सामना खेळत होता, त्याने हैदराबादला सुरुवातीलाच तीन धक्के दिले. त्याने हैदराबादचे दोन्ही सलामीवीर, अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड, यांना एकाच षटकात बाद केले. अभिषेक 7 धावांवर, तर हेड 11 धावांवर बाद झाला.
त्यानंतर, पाचव्या षटकात जेकब डफीने नितीश कुमार रेड्डीला एका धावेवर बाद केले. 29 धावांत तीन गडी गमावल्यानंतर कर्णधार इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी सनरायझर्स हैदराबादचा डाव सावरला आणि एक भक्कम भागीदारी रचली, पण ही भागीदारी रोमारियो शेफर्डने तोडली. त्याने क्लासेनला 31 धावांवर बाद केले. त्यानंतर सलील अरोरा 9 धावांवर सुयश शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला.
ईशान किशनचा 80 धावांचा तडाखा…
धमाकेदार खेळीनंतर अभिनंदन सिंगने ईशान किशनला बाद केले. किशनने 38 चेंडूमध्ये 8 चौकार आणि 5 षटकारांसह 80 धावांची स्फोटक खेळी केली. शेवटी अनिकेत वर्माने अवघ्या 18 चेंडूमध्ये 43 धावांची धडाकेबाज खेळी करून संघाची धावसंख्या 190 च्या पुढे नेली. त्याने या खेळीत 3 चौकार आणि 4 षटकार मारले.
आमच्याकडे पाठलाग करण्यासाठी 🎯 आहे. चला जाऊया! 👊#PlayBold #OurRCB #IPL2026 #RCBvSRH pic.twitter.com/E2QMz1Wjs3
— रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (@RCBTweets) 28 मार्च 2026
गतविजेत्या बंगळुरूने फोडला विजयाचा नारळ
सनरायझर्स हैदराबादने ठेवलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने दमदार सुरुवात केली. सलामीवीर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी पॉवर प्लेमध्ये मिळून 74 धावा केल्या. त्यानंतर पडिक्कलने अवघ्या 21 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी 110 धावांची भागीदारी केली. देवदत्त 61 (26) धावांवर बाद झाला, त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 4 षटकार मारले. देवदत्त पडिक्कलनंतर फलंदाजीला आलेला रजत पाटीदारही 3 षटकार आणि 2 चौकारांसह 31 धावा करून बाद झाला. पुढच्याच चेंडूवर जितेश शर्मा शून्यावर बाद झाला. सलग दोन चेंडूंवर 2 गडी गमावल्याने आरसीबीला मोठा धक्का बसला. पण मग, विराट कोहली आणि टीम डेव्हिड यांनी एकत्र येऊन आरसीबीला विजय मिळवून दिला. विराटने 38 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 5 षटकारांसह नाबाद 69 धावांची खेळी केली. टीम डेव्हिड 10 चेंडूंमध्ये 16 धावांवर नाबाद राहिला. अशाप्रकारे, आरसीबीने 16 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर लक्ष्य गाठले आणि 6 गडी राखून सामना जिंकला.
चेस मास्टर साठी 5️⃣0️⃣ Numero 6️⃣4️⃣ #TATAIPL. 🐐 pic.twitter.com/8jZLrvlttj
— रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (@RCBTweets) 28 मार्च 2026
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.