RCB विकायला काढली, 5 उद्योजक रांगेत! चॅम्पियन झाल्यावरही अशी वेळ का आली? जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
3 जून 2025 रोजी अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. या ऐतिहासिक विजयाचा उत्सव देशभरात जल्लोषात साजरा करण्यात आला. परंतु विजयाच्या अवघ्या काही महिन्यांनंतर हीच टीम आता मालकी बदलाच्या चर्चेत आली आहे. आरसीबीची मालकी असलेल्या डियाजिओ कंपनीच्या भारतीय शाखा युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (USL) ने 5 नोव्हेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) कडे पाठवलेल्या अधिकृत पत्रामुळे या चर्चेला अधिक बळ मिळाले आहे. या पत्रात USL ने रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (RCSPL) या उपकंपनीतील गुंतवणुकीचे रणनीतिक पुनरावलोकन सुरू केल्याचे स्पष्ट केले आहे. RCSPL हीच कंपनी आरसीबीच्या पुरुष (IPL) आणि महिला (WPL) संघांची मालकी राखते.
या रणनीतिक पुनरावलोकनाचा अर्थ फ्रँचायझी विक्रीची प्रक्रिया सुरू झाल्याचे संकेत म्हणून घेतले जातात. कंपनीने सांगितले आहे की सर्व स्टेकहोल्डर्सच्या दीर्घकालीन हितासाठी आणि भारतातील व्यवसायाचे मूल्य वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बाजारातील अंदाजानुसार सध्या आरसीबीची किंमत जवळपास 2 अब्ज डॉलर्स म्हणजे अंदाजे 17 हजार कोटी रुपये इतकी असू शकते. USL चे व्यवस्थापकीय संचालक आणि CEO प्रविण सोमेश्वर यांनी स्पष्ट केले की RCB हा ब्रँड कंपनीसाठी महत्त्वाचा असला तरी मुख्य व्यवसायपेक्षा तो वेगळा विभाग आहे. त्यामुळे भविष्यातील दिशानिर्देश ठरवण्यासाठी पुनरावलोकन आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
डियाजिओ RCB विक्रीच्या विचारात असण्यामागे काही महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत. एक म्हणजे कंपनीचा मुख्य केंद्रबिंदू मद्यव्यवसाय आहे आणि स्पोर्ट्स फ्रँचायझी हा नॉन-कोअर विभाग मानला जातो. दुसरे म्हणजे टीम विक्रीमुळे कंपनीला मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यासोबतच आरसीबीच्या विजयाच्या सेलिब्रेशनदरम्यान चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 11 लोकांचा मृत्यू झाल्याने ब्रँड इमेजवर दबाव वाढला होता.
नव्या मालकाबाबत अनेक कंपन्यांची नावे पुढे येत आहेत. अदानी ग्रुप, सीरम इन्स्टिट्यूटचे अदार पूनावाला, देवयानी इंटरनॅशनलचे रवी जयपूरिया आणि दोन अमेरिकन प्रायव्हेट इक्विटी फर्म्स यांनी रस दाखवला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, टीम विक्री झाली तरी विराट कोहलीच्या भविष्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कारण कोहलीचा करार फ्रँचायझीशी आहे, मालक कंपनीशी नाही. स्वतः कोहलीनेही अनेक वेळा सांगितले आहे की तो RCB सोडणार नाही. त्यामुळे चाहत्यांनी याबाबत चिंता करण्याची गरज नाही.
Comments are closed.