आयपीएलमध्ये कधीपर्यंत खेळणार विराट कोहली? आरसीबीच्या 'या' खेळाडूने केला मोठा खुलासा! म्हणाला…

आयपीएल मधील विराट कोहली: भारतीय दिग्गज फलंदाज विराट कोहलीने गेल्या 1 वर्षात टी20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच धक्का दिला. अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो की कोहली आयपीएलमध्ये कधीपर्यंत खेळणार? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघासाठी कोहलीचे अस्तित्व संघ आणि चाहते दोघांसाठीही खूप खास आहे. दरम्यान, आरसीबीचा युवा फलंदाज स्वास्तिक चिकाराने कोहलीसोबत झालेल्या संवादाचा मोठा खुलासा केला आहे. कोहलीने तो कधीपर्यंत खेळणार आहे, हेही सांगितले.

20 वर्षीय चिकारा, उत्तर प्रदेशचा उजव्या हाताचा फलंदाज आहे. आयपीएल 2025 दरम्यान त्याला कोहलीसोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली. अलीकडेच ‘रेव्हस्पोर्ट्झ’ला दिलेल्या मुलाखतीत चिकाराने कोहलीचा आयपीएलमधील भविष्याचा काय विचार आहे, याचा खुलासा केला. (Virat Kohli retirement plan IPL)

स्वास्तिकच्या म्हणण्यानुसार, विराटने सांगितले की, “जोपर्यंत मी पूर्णपणे फिट आहे, तोपर्यंत मी क्रिकेट खेळत राहीन. मी ‘इम्पॅक्ट प्लेयर’सारखा खेळणार नाही. मी वाघासारखा खेळेन, 20 ओव्हर क्षेत्ररक्षण करेन आणि नंतर फलंदाजीही करेन. ज्या दिवशी मला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळावे लागेल, त्याच दिवशी मी क्रिकेट सोडून देईन.” (Kohli impact player statement)

कोहलीने आयपीएल 2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. कोहलीने 15 सामन्यांमध्ये 657 धावा केल्या. यात त्याने 8 अर्धशतके झळकावली आणि त्याचा स्ट्राइक रेट जवळपास 145 होता. कोहलीच्या जबरदस्त कामगिरीमुळे आरसीबीने 17 वर्षांत पहिल्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. फायनल सामन्यातही कोहलीने दमदार कामगिरी केली. तो आपल्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. (Kohli IPL 2025 performance)

आयपीएलच्या फायनल सामन्यात कोहलीने पंजाबविरुद्ध 35 चेंडूत 43 धावा केल्या. पंजाबला हरवून आरसीबी आणि कोहलीने 17 वर्षांत पहिल्यांदा ट्रॉफी जिंकून इतिहास रचला. (RCB IPL 2025 champion) चिकाराबद्दल बोलायचे झाल्यास, तो आरसीबी संघाचा भाग होता, पण त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही.

Comments are closed.