IPL 2026: रेप आरोप असलेला खेळाडू RCBच्या संघात रिटेन, आयपीएल 2026 मध्ये खेळताना दिसणार

आयपीएल 2026 (IPL 2026) साठी RCBने रिटेंशन लिस्ट जाहीर केली. टीमने एकूण 8 खेळाडू रिलीज केले आहेत. आगामी हंगामात आपला खिताब जपण्यासाठी RCB मैदानात उतरली आहे. टीमने रिटेंशन लिस्टमध्ये एका अशा खेळाडूला जागा दिली आहे, ज्यावर रेपचा आरोपही आहे. हा खेळाडू IPL 2026 मध्ये RCBचे प्रतिनिधित्व करणार आहे.

जून 2025 मध्ये गाझियाबादच्या एका युवतीने वेगवान गोलंदाज यश दयाल (Yash Dayal) वर रेपचा आरोप केला होता. युवतीने सांगितले की यश दयालने लग्नाचे वचन देऊन तिचे लैंगिक शोषण केले. पीडितेने 21 जूनला मुख्यमंत्री योगी यांच्याकडे तक्रारही केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिचा जबाबही नोंदवला. आता RCBने आगामी हंगामासाठी यश दयालवर विश्वास दाखवून त्याला रिटेन केले आहे.

आयपीएल 2025 मध्ये यश दयालने RCBसाठी शानदार कामगिरी केली होती. 15 सामने खेळून त्याने 13 विकेट घेतल्या. तर 2024 मध्ये त्याने 14 सामने खेळून 15 विकेट घेतल्या होत्या. दोन हंगामांपासून यश दयाल RCBचा भाग आहे. मात्र 2023 मध्ये गुजरात टायटन्सचा भाग असताना, KKRच्या फलंदाज रिंकू सिंगने त्याच्यावर फक्त 5 चेंडूत सलग 5 षटकार ठोकले होते.

RCBमध्ये रिटेन केलेले खेळाडू:
रजत पाटीदार, विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेकब बेथेल, जोश हेझलवूड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिक सलाम, अभिनंदन शर्मा, अभिनंदन सिंग.

RCBने आगामी हंगामासाठी आपली टीममध्ये मोठे बदल केले आहेत. टीमने स्वास्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, लियाम लिव्हिंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी नगिडी, ब्लेसिंग मुजरबानी आणि मोहित राठी यांना रिलीज केले आहे.

Comments are closed.