RCB vs RR: विराट- पडिकलची शानदार खेळी, राजस्थानला दिलं 206 धावांचं आव्हान
आयपीएल 2025 स्पर्धेतील 42 वा सामना आज म्हणजेच 24 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स संघात खेळला जात आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच आरसीबीला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. आरसीबीने प्रथम फलंदाजी करून 205 धावा केल्या आहेत. तसेच आता राजस्थानला जिंकण्यासाठी 206 धावांचं आव्हान दिलं आहे.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीसाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीने केल्या. त्याने 42 चेंडूत 70 धावा करत 8 चौकार तसेच 2 षटकार झकावले. त्याचबरोबर देवदत्त पडिकलने सुद्धा अर्धशतकी खेळी केली. फिल साल्ट (26) टीम डेविड (23) जितेश शर्मा (20) धावा केल्या. यामुळे आरसीबी 205 धावा करू शकली. पाच खेळाडू गमावून आरसीबीने 205 धावांचं आव्हान उभं केलं आहे.
राजस्थानसाठी दोन विकेट्स संदीप शर्माने घेतल्या. तसेच जोफ्रा आर्चर आणि हसरंगा यांनी 1-1 विकेट घेतली. आता राजस्थान हे आव्हान पूर्ण करू शकेल का हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.
Comments are closed.