व्यंकटेश अय्यर तिसऱ्या क्रमांकावर खेळणार! IPL 2026 मध्ये 'या' 11 खेळाडूंसह आरसीबी मैदानात उतरण्याची शक्यता

आयपीएल 2026 (IPL 2026) च्या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) ने अतिशय विचारपूर्वक खेळाडूंवर बोली लावली. संघाने व्यंकटेश अय्यरला (Venkatesh Iyer) 7 कोटी रुपयांना खरेदी करून आपल्या ताफ्यात सामील केले. तसेच, उत्तर प्रदेशचा अष्टपैलू खेळाडू मंगेश यादवसाठीही आरसीबीने मोठी रक्कम खर्च केली.

याशिवाय, न्यूझीलंडचा घातक वेगवान गोलंदाज जॅकब डफी याचीही आरसीबीमध्ये एन्ट्री झाली आहे. कागदावर पाहता, गतविजेता (Defending Champion) आरसीबीचा संघ गेल्यावेळेपेक्षाही अधिक संतुलित आणि मजबूत दिसत आहे.

आगामी हंगामातही विराट कोहली आणि फिल सॉल्ट आरसीबीसाठी डावाची सुरुवात करताना दिसतील. गेल्या हंगामात या जोडीने धावांचा पाऊस पाडला होता. तिसऱ्या क्रमांकावर व्यंकटेश अय्यर खेळण्याची शक्यता आहे.
चौथ्या क्रमांकावर रजत पाटीदार तर
पाचव्या क्रमांकावर टिम डेव्हिड याचसोबत सहाव्या क्रमांकावर जितेश शर्मा (यष्टीरक्षक) आणि
फिनिशर रोमारियो शेफर्ड आणि कृणाल पांड्या यांच्यावर अखेरच्या षटकांत फटकेबाजीची जबाबदारी असेल.

आरसीबीची गोलंदाजी यावेळी खूपच धारदार दिसत आहे. जोश हेझलवूडला आता भुवनेश्वर कुमार आणि यश दयाल यांची साथ मिळेल. बॅकअप म्हणून त्यांच्याकडे जॅकब डफीसारखा पर्यायही उपलब्ध आहे. फिरकी गोलंदाजीची धुरा कृणाल पांड्या सांभाळेल, ज्याने गेल्या हंगामात संघाला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली होती.

आरसीबीची संभाव्य प्लेइंग इलेव्हन:
फिल सॉल्ट, विराट कोहली, व्यंकटेश अय्यर, रजत पाटीदार, टिम डेव्हिड, जितेश शर्मा, रोमारियो शेफर्ड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, यश दयाल, जोश हेझलवूड.

Comments are closed.