KKR vs RCB : दोन्ही संघ आमनेसामने! जाणून घ्या कोणत्या संघाच पारडं जड?
आयपीएल 2025 स्पर्धेला सुरुवात होण्यास फक्त काही तास राहिले आहेत. या हंगामाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. केकेआर संघाने मागच्या हंगामातील आयपीएल ट्रॉफी जिंकली होती, ते याही वर्षी ट्रॉफी जिंकण्याच्याच आशेने मैदानात उतरतील. तसेच आरसीबीला त्यांच्या पहिल्या ट्रॉफीची प्रतीक्षा असेल.
केकेआर आणि आरसीबी दोन्ही संघांमध्ये हा सामना ईडन गार्डनच्या मैदानावर खेळला जाणार आहे. केकेआर आणि आरसीबी दोन्ही संघ नव्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरतील. कोलकाता संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे सांभाळत आहे, तर आरसीबीची जबाबदारी युवा कर्णधार रजत पाटीदारला सोपवण्यात आली आहे. अजिंक्य रहाणे याआधी सुद्धा आयपीएलमध्ये कर्णधार पद भूषवले आहे. तसेच पाटीदार पहिल्यांदा नेतृत्व करणार आहे.
तसेच चाहत्यांसाठी एक निराशा जनक बाब समोर येत आहे. केकेआर आणि आरसीबी सामन्यादरम्यान पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची 80% शक्यता आहे.
दोन्ही संघांच्या हेट टू हेड सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, केकेआर आणि आरसीबीने एकूण 34 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये कोलकाताने 20 सामने जिंकले आहेत. तर 14 सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. जरी केकेआर संघाचे पारडं जड दिसत असलं, तरीही यावेळी आरसीबी संघ खूप मजबूत आहे.
कोलकाता नाइट राइडर्स संघाची संभाव्य प्लेइंग इलेवन– क्विंटन डिकॉक (यशर रक्षा), अजिंक्य राहणे, वैंधेत अय्यर, अंगक्रीश रघुवन्शी, रिंकू सिंग, रामंदिप सिंग, आंद्रे रसल, सुनील नरेन, हरशीत राणा, एरिक नॉरझे/स्पेन्सर जॉन अनी व्हेरुन चक्रव्टी.
आरसीबी संघाची संभाव्य प्लेइंग इलेवन– फिल सलाट, विराट कोहली, रजत पाटीदार (कर्नाधर), जितेश शर्मा (यशर रक्ष), टिम डेव्हिड, लियाम लिव्हिंगस्टोन, क्रुनल पंड्या, जोश हेझलवुड/रोमेरिओ शेफर्ड, भुवनेश्वर कुमार
Comments are closed.