RCB-KKR पहिल्या सामन्यात कोण वरचढ ? आकडे सांगतात कोण मारणार बाजी
आगामी आयपीएल 2025 स्पर्धेची सुरुवात 22 मार्चपासून होणार आहे. हंगामातील पहिल्या सामन्याच यजमानपद कोलकाताकडे आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर कोलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु दोन्ही संघात इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामातील पहिला सामना खेळला जाणार आहे.
केकेआर संघ मागच्या हंगामातील चॅम्पियन्स आहे. तसेच बंगळुरू संघाने मागच्या हंगामात दुसऱ्या हाफमध्ये जबरदस्त प्रदर्शन करून प्लेऑफ मध्ये संघाचे स्थान पक्के केले होते. इथे जाणून घ्या आयपीएल 2025 स्पर्धेच्या पहिल्या सामन्यापूर्वी आकंड्यानुसार कोलकत्ता आणि बंगळुरू मध्ये कोणाचं पारडं जड आहे.आयपीएल 2025 स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोलकत्ता संघाचं पारडं जड दिसून येत आहे. दोन्ही संघातील मागचे 7 सामने पाहिले तर, फक्त एकदा आरसीबीने विजय मिळवला आहे. तसेच मागच्या सलग 4 सामन्यात कोलकाताने आरसीबीचा पराभव केला आहे. तसेच आगामी आयपीएल हंगामात दोन्ही संघ बदललेले दिसून येतील. त्यामुळे इतिहासाच्या आधारे एखाद्या संघाला अधिक चांगलं म्हणता येणार नाही.
तसेच या हंगामात कोलकत्ताचा कर्णधार अजिंक्य रहाणे असणार आहे. ज्याला इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक स्तरावर कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे. पहिल्या सामन्यात त्याच्यांसमोर रजत पाटीदारच्या नेतृत्वातील आरसीबी संघ असणार आहे. ज्यामध्ये विराट कोहली, जोश हेजलवूड आणि भुवनेश्वर कुमार असे अनेक दमदार खेळाडू आहेत.
आरसीबी संघाचं स्क्वाड: विराट कोहली, रजत पाटिदार (कर्नाधर), यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, फिल सलाट, जितेश शर्मा, जोश हेझलवुड, रसीख दार, सुयाश शर्मा, भुवनेश्वर कुमार, क्रुनल पांड्या, स्वापनिल सिंह, टिम डेव्हिड, रौमारो
केकेआर संघाचं स्क्वाड: रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, सुनील नरेन, आंद्रे रसल, हरशीत राणा, रामंदिप सिंग, व्हायंकटेश अय्यर, क्विंटन डिकॉक, रेहमानुल्लाह गुर्बाझ, समृद्ध नॉर्टजे, अंगक्श रघुवन्शी, वैभव अरोरा, मेंसी, रोहन्क, रोंडी
Comments are closed.