R.D. Blasters Ccche Continuation, सूर्यवंशी क्षत्रिय क्रिकेट लीग

सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज, मुंबई आयोजित पहिल्या सूर्यवंशी क्षत्रिय टी- ट्वेंटी क्रिकेट लीगमध्ये आर.डी. ब्लास्टर्स सीसीने सूर्यवंशी वॉरियर्स सीसीवर 9 विकेट राखून मात केली.
मुंबई पोलीस जिमखाना येथे खेळवण्यात येत असलेल्या स्पर्धेत गुरुवारी आर.डी. ब्लास्टर्स सीसीने सांघिक कामगिरीमध्ये सातत्य राखले. त्यांनी सूर्यवंशी वॉरियर्स सीसीचे 118 धावांचे आव्हान केवळ 14 षटकांत एका विकेटच्या बदल्यात पार केले. तिसऱया क्रमांकावरील कर्णधार उत्कर्ष राऊतने 31 चेंडूंत 9 चौकार आणि 3 उत्तुंग षटकारांसह 67 धावांची नाबाद खेळी करताना त्यात मोलाचा वाटा उचलला. त्याला भाविक राऊत (नाबाद 44) चांगली साथ लाभली.
तत्पूर्वी, सूर्यवंशी वॉरियर्स सीसीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 बाद 117 धावा केल्या. त्यात श्रेयस पाटीलने (32 धावा) सर्वाधिक योगदान दिले. आर.डी. ब्लास्टर्स सीसीचा समीर पाटील (3 विकेट) सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. उत्कर्ष राऊतला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.
n संक्षिप्त धावफलक ः प्राइड ऑफ पालघर इलेव्हन सीसी – 19.3 षटकांत सर्वबाद 111 (भाविक पाटील 23; पंकज पाटील 4/15, प्रीतेश ठापूर 2/11) वि. इंस्पायर्ड रॉयल्स सीसी – 19.1 षटकांत 5 बाद 112 (ध्रुव राऊत 31, केदार राऊत 27, नील दादरकर 21*). निकाल ः इंस्पायर्ड रॉयल्स विजयी. सामनावीर ः पंकज पाटील (इंस्पायर्ड रॉयल्स सीसी). सूर्यवंशी वॉरियर्स सीसी – 20 षटकांत 9 बाद 117(श्रेयस पाटील 32, आयुष एम. 22*, अभिजित पाटील 20; समीर पाटील 3/14) वि. आर.डी. ब्लास्टर्स सीसी – 14 षटकांत 1 बाद 121 (उत्कर्ष राऊत 67*(31 चेंडू, 9 चौकार, 3 षटकार); भाविक राऊत 44 *). निकाल ः आर.डी. ब्लास्टर्स विजयी. सामनावीर ः उत्कर्ष राऊत (आर. डी. ब्लास्टर्स).

Comments are closed.