मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलोय, आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का करा – उद्धव ठाकरे

मुंबईच्या विकासासाठी आपण मैदानात उतरलोय असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच आपला वचननामा सर्व मुंबईकरांपर्यंत पोहचवून तुमचा विजय पक्का करा असा विश्वासही व्यक्त केला.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेना भवन येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षांच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. मुंबईतील मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्यासाठी, सामान्य मुंबईकरांच्या प्रश्नांसाठी आणि मुंबईच्या विकासासाठी आपण निवडणूक मैदानात उतरलो आहोत, असे ते म्हणाले. आपला वचननामा प्रत्येक मुंबईकरापर्यंत पोहोचवून तुम्ही निश्चित विजय मिळवाल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. या प्रसंगी युवासेनाप्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे, मनसे नेते अमित ठाकरे, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, सचिव आणि खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते व आमदार अॅड. अनिल परब यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Comments are closed.