Reacting to Sanjay Raut claim of Home Ministership in his book narkatla swarg Hasan Mushrif targeted Sharad Pawar


संजय राऊत यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी हसन मुश्रीफ यांच्या नावाचा विचार झाला होता, मात्र हे पद मुश्रीफ यांच्यासाठी अडचणीचे ठरेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाटले, असा उल्लेख आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात केला आहे. यावर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे “नरकातला स्वर्ग” हे प्रदर्शनापूर्वी आणि प्रदर्शनानंतर सध्या चांगलेच चर्चेत आहे. संजय राऊत यांनी तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारमध्ये गृहमंत्रीपदासाठी हसन मुश्रीफ यांच्या नावाचा विचार झाला होता, मात्र हे पद मुश्रीफ यांच्यासाठी अडचणीचे ठरेल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना वाटले, असा उल्लेख केला आहे. यावर आता वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Reacting to Sanjay Raut claim of Home Ministership in his book narkatla swarg Hasan Mushrif targeted Sharad Pawar)

संजय राऊत यांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकात तुमचा गृहमंत्रीपदासाठी विचार झाला होता, असा उल्लेख असल्यासंदर्भात प्रश्न मंत्री हसन मुश्रीफ यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, संजय राऊत यांचा हा मोठेपणा आहे. कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मला कोणते खाते पाहिजे, याबद्दल विचारणा केली होती. तेव्हा मी त्यांच्याकडे ग्रामविकास खाते मागितले होते. पण गृहमंत्री पदासाठी माझा विचार करताना कदाचित त्यांना (शरद पवार) भीती वाटली असेल, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी नाव न घेता केली.

हेही वाचा – Sharad Pawar : शिष्टमंडळावरून राजकारण नको, शरद पवारांचा संजय राऊतांना सल्ला

नरकातला स्वर्ग या पुस्तकात गृहमंत्रीपदाबाबत काय दावा आहे?

संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर गृहखाते कोणाकडे जाणार यावर पैजा लागल्या होत्या. कोल्हापूरचे हसन मुश्रीफ हे एक रांगडे व तगडे गडी. त्यामुळे मुश्रीफ हे एक उत्तम चॉईस ठरले असते. परंतु, मुसलमान असल्याने प्रत्येक गोष्टीत त्यांना टार्गेट केले जाईल, अशी भीती शरद पवार यांना वाटली. खरे तर मुश्रीफ हे कमालीचे पुरोगामी होते. पक्के निधर्मी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व. शाहू महाराजांवर अपार श्रद्धा असलेलेल कार्यकर्ते, पण शेवटी धर्म आडवा आला, असे संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबरमध्ये; अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश



Source link

Comments are closed.