वनडे सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम कोणत्या गोलंदाजांच्या नावावर? यादीत भारतीय खेळाडू गैरहजर?
एका वनडे सामन्यात सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंदा वासच्या नावावर आहे. वासने हा विक्रम 2001 साली झिंबाब्वेविरुद्ध केला होता. तब्बल 24 वर्षांपासून हा विक्रम कुणालाही मोडता आलेला नाही. वासचा हा विक्रम मोडणे एवढ सोपं नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या यादीत एकही भारतीय गोलंदाज नाही.
श्रीलंकेच्या दिग्गज वेगवान गोलंदाज चामिंदा वासने 2001 साली झिंबाब्वेविरुद्ध फक्त 8 षटकांत 19 धावा देत तब्बल 8 गडी बाद केले होते. यामुळे श्रीलंकेने झिंबाब्वेला केवळ 38 धावांत गुंडाळले आणि सामना 9 गडी राखून जिंकला. वासचा हा विक्रम मागील 24 वर्षांपासून कोणीही मोडू शकलेला नाही.
पाकिस्तानचा स्पिन ऑलराऊंडर शाहिद आफ्रिदी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आफ्रिदीने 2013 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 9 षटकांत फक्त 12 धावा देत 7 बळी घेतले होते. यामुळे पाकिस्तानने हा सामना तब्बल 126 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता.
ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मॅक्ग्राने 2003 साली नामिबियाविरुद्ध 7 षटकांत फक्त 15 धावा देत 7 बळी मिळवले होते. त्याच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नामिबियाला केवळ 45 धावांत हरवले आणि सामना तब्बल 256 धावांनी जिंकला होता.
अफगाणिस्तानचा लेग स्पिनर रशीद खान या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. रशीदने 2017 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 8.4 षटकांत फक्त 18 धावा देत 7 बळी घेतले होते. त्याच्या जोरावर अफगाणिस्तानने हा सामना 63 धावांनी जिंकला होता.
श्रीलंकेचा लेग स्पिनर वानिंदु हसरंगा या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. हसरंगाने 2024 साली झिंबाब्वेविरुद्ध 5.5 षटकांत फक्त 19 धावा देत 7 गडी बाद केले होते. श्रीलंकेने झिंबाब्वेला 96 धावांत गुंडाळलं आणि सामना 8 गडी राखून जिंकला.
Comments are closed.