Rain Alert : मुसळधार! मुंबई, ठाण्याला रविवारी पावसाचा रेड अलर्ट

रविवारी 28 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने मुंबई, ठाणे, रायगड, पालघरला पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या चार जिल्ह्यांमध्ये रविवारी विजांचा कडकडाट व जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडणार आहे. या व्यतिरिक्त नाशिक व पुण्यातील घाट परिसरातही रेड अलर्ट देण्यात आला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf9chd भेट घ्या.
– प्रादेशिक मेटेरोलॉजिकल सेंटर, मुंबई (@आरएमसी_मुंबई) 27 सप्टेंबर, 2025
सध्या नवरात्रीची धूम सुरू असतानाच पावसाने देखील मुंबईकरांच्या गरब्यावर विरजण घातलं आहे. शनिवार रविवार विकेंड निमित्ताने गरबा खेळायला जायची तयारी केलेल्या मुंबईकरांचा गरबा चिखलात होणार असे दिसतेय.
Comments are closed.