मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक, पोलिसात तक्रार

Meenatai Thackeray: स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला आहे दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याशी संबंधित आहे. काल रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हलाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. ठाकरे गटाकडून यासंदर्भात तक्रार आल्यास तक्रार दाखल करण्यात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. ठाकरे गटाकडून तक्रार न झाल्यास पोलीस स्वतः तक्रार दाखल करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांची पत्नी मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक  प्रचंड मानायचे. 1995 साली मीनाताई ठाकरे यांचे निधन झाले होते. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. गेल्या अनेक वर्षांपासून हा पुतळा याठिकाणी आहे.

https://www.youtube.com/watch?v=eyuewnb5quo

आणखी वाचा

Comments are closed.