रिलायन्सचे शेअर्स २ टक्क्यांनी वाढले

मुंबई :

मेटा (फेसबुक)सोबत भागीदारीतून नवी एआय कंपनी स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रिजचा समभाग सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी चांगलाच चमकलेला दिसून आला. समभाग सोमवारी शेअरबाजारात इंट्रा डे दरम्यान 2.2 टक्के वाढत 1463 रुपयांच्या स्तरावर कार्यरत राहिला होता. 20 ऑक्टोबरनंतर एकाच दिवसात इतका वधार समभागात दिसून आला. मेटासमवेत भागीदारीतून रिलायन्स एंटरप्राइज इंटेलिजन्स लिमिटेड ही नवी एआय कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या बातमीचा परिणाम समभागावर सोमवारी पाहायला मिळाला.

Comments are closed.