अभिनेता इमरान खान यांना दिलासा; हिंदुस्थान सोडण्याच्या नोटिशीला मुंबई उच्च न्यायालयाची स्थगिती

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

बॉलिवूड अभिनेता इमरान खान यांना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. हिंदुस्थान सोडण्यासंदर्भात बजावण्यात आलेल्या ‘लीव्ह इंडिया’ नोटिशीला आव्हान देणाऱ्या त्यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने संबंधित आदेशाच्या अंमलबजावणीला पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम स्थगिती दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. सुनावणीदरम्यान केंद्र सरकारच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल यांनी प्रकरणाची सुनावणी सोमवारपर्यंत पुढे ढकलण्याची विनंती केली. तसेच, तोपर्यंत अभिनेता इमरान खान यांच्याविरोधात कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचे तोंडी आश्वासन दिले. त्यानंतर न्यायालयाने संबंधित नोटिशीच्या अंमलबजावणीला पुढील सुनावणीपर्यंत स्थगिती दिली.

10 ऑक्टोबर रोजी मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान येथे झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याच्या प्रकरणावरून इमरान खान यांना मुंबई पोलिसांनी हिंदुस्थान सोडण्याची नोटीस बजावली होती. परदेशी नागरिक आणि इमिग्रेशनविषयक कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्याचा आरोप करत त्यांना 28 ऑक्टोबरपर्यंत हिंदुस्थान सोडण्यास सांगण्यात आले होते. या नोटिशीला इमरान खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. ही नोटीस बेकायदेशीर असून, कोणतेही योग्य कारण नसताना गैरसमजातून ती बजावण्यात आल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला आहे. तसेच, आपल्याला विनाकारण लक्ष्य करून बळीचा बकरा बनवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Comments are closed.