केंद्रीय मंत्री पुरी यांच्या मुलीला दिलासा

एपस्टीनशी संबंधित कंटेट सोशल मीडियावरून हटवा : उच्च न्यायालयाचा आदेश

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांची कन्या हिमायनी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करत स्वत:ला जेफ्री एपस्टीनसोबत जोडणारे ऑनलाइन न्यूज रिपोर्ट्स, सोशल मीडिया पोस्ट्स, व्हिडिओ आणि अन्य सामग्री हटविण्याची मागणी केली होती. तसेच भरपाईपोटी 10 कोटी रुपयांची मागणी त्यांनी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने सोशल मीडिया युजर्सवर हिमायनी यांना एपस्टीनशी जोडणारा कंटेंट प्रकाशित अन् प्रसारित करण्यास बंदी घातली आहे.

हिमायनी पुरी यांना अमेरिकेचा लैंगिक गुन्हेगार एपस्टीनसोबत जोडणारा सोशल मीडियावरील कंटेंट 24 तासांच्या आत हटविण्याचा निर्देश उच्च न्यायालयाने दिला आहे. उच्च न्यायालयाने अशाप्रकारच्या सामग्रीचे प्रकाश अन् प्रसारावरही बंदी घातली आहे. जेफ्री एपस्टनी किंवा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांशी हिमायनी यांचा वित्तीय संबंध राहिला असल्याचा खोटा दावा अनेक पोस्ट अन् रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

इंटरनेटवर माझ्याविषयी प्रसारित अनेक पोस्ट अन् रिपोर्ट्समध्ये खोटे दावे करण्यात आले आहेत. एपस्टीन किंवा त्याच्या गुन्हेगारी कृत्यांशी माझा कुठल्याही प्रकारे संबंध नव्हता. अशाप्रकारचा कंटेंट माझ्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्याला गंभीरप्रकारे नुकसान पोहोचवित आहे. खोट्या माहितीच्या प्रसारामुळे माझ्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचली असल्याचा दावा हिमायनी यांनी याचिकेत केला आहे. तसेच त्यांनी भरपाईपाटी 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

हिमायनी पुरी यांनी अनेक सोशल मीडिया कंपन्या आणि अज्ञात व्यक्तींच्या विरोधात स्थायी कारवाईचीही मागणी केली. याचिकेत एपस्टीनशी नाव जोडणारे जभरातील विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवर प्रकाशित पोस्ट, लेख अन् व्हिडिओ हटविण्याचे निर्देश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Comments are closed.