Renowned filmmaker Shyam Benegal passes away at the age of 90 after a prolonged illness rrp
मुंबई : प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे आज, सोमवारी (23 डिसेंबर) सायंकाळी 6.30 वाजता निधन झाले आहे. अनेक दिवसांपासून आजारी असलेल्या श्याम बेनेगल यांनी 90 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. (Renowned filmmaker Shyam Benegal passes away at the age of 90 after a prolonged illness)
श्याम बेनेगल यांनी 14 डिसेंबर रोजी त्यांचा 90 वा वाढदिवस मित्र आणि कुटुंबासह साजरा केला. बेनेगल यांच्या वाढदिवसाला अभिनेते कुलभूषण खरबंदा, नसीरुद्दीन शाह, दिव्या दत्ता, शबाना आझमी, रजित कपूर, अतुल तिवारी, चित्रपट निर्माता-अभिनेता व शशी कपूर यांचा मुलगा कुणाल कपूर आणि इतर अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती. मात्र श्यान बेनेगल हे किडनीशी संबंधित समस्यांनी त्रस्त होते. त्यांच्या निधनाच्या वृत्ताला त्यांची मुलगी पिया बेनेगल हिने एका इंग्रजी वृत्तसंस्थेशी बोलताना दुजोरा दिला आहे. यावेळी तिने असेही म्हटले की, एक दिवस ही गोष्ट घडणार होती. बेनेगल यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांना भारत सरकारने 1976 मध्ये पद्मश्री आणि 1991 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. त्यांच्या यशस्वी चित्रपटांमध्ये मंथन, जुबैदा आणि सरदारी बेगम यांचा समावेश आहे.
– Advertisement –
श्याम बेनेगल यांचा जन्म 14 डिसेंबर 1934 रोजी झाला. त्यांनी 1974 मध्ये ‘अंकुर’ चित्रपटातून दिग्दर्शनाला सुरुवात केली. हा चित्रपट सामाजिक विषयावर आधारित होता. या चित्रपटाने त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली. याशिवाय त्यांनी महत्त्वाचे चित्रपटही केले. त्यांनी ‘निशांत’, ‘मंथन’, ‘भूमिका’, ‘सरदारी बेगम’ असे संस्मरणीय चित्रपट केले, जे आजही स्मरणात आहेत. महत्त्वाचे म्हणजे ‘मंथन’ हा पहिला चित्रपट श्याम बेनेगल यांनी प्रेक्षकांच्या आर्थिक पाठबळावर बनला असल्याची माहिती आहे. हा चित्रपट दुग्ध व्यवसायावर आधारित होता. त्यांच्या चित्रपटांचा सर्वात मोठा गुण म्हणजे त्यांनी सर्वसामान्यांचे जीवन आणि त्यांच्या संघर्षाचे सत्य मांडले.
सविस्तर बातमी लवकरच
Comments are closed.