महापरिनिर्वाण दिनासाठी निवासी मंडप, सुरक्षा, भोजन आणि आरोग्य व्यवस्था पालिकेकडून सर्व नागरी सुविधा तैनात; आठ हजार कर्मचारी-अधिकारी ऑनडय़ुटी
‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या भीम अनुयायांसाठी महानगरपालिकेने सर्व नागरी सुविधा तैनात ठेवल्या आहेत. यामध्ये चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान आणि राजगृह या ठिकाणी नागरी सुविधा देण्यात येणार आहेत. शिवाजी पार्प येथे निवासी मंडप, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, धूळ प्रतिबंधक आच्छादन आणि मंडप आदी सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. पालिकेचे तब्बल आठ हजार कर्मचारी-अधिकारी यावेळी ऑनडय़ुटी राहणार आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर लाखो भीम अनुयायांचा जनसागर लोटत असतो. या पार्श्वभूमीवर अनुयायांसाठी सर्व प्रकारच्या नागरी सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश प्रशासक तथा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले होते. यानुसार अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी पूर्वतयारीचा आढावा घेतला. छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळावर वॉटरप्रूफ निवासी मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. निवासी मंडपांत 10 ठिकाणी एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. 30 हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या पायवाटांवर धूळ प्रतिबंधक आच्छादन केले आहे, तर मैदानाभोवती एक हजार मीटर लांबीचे तात्पुरते पुंपण लावले आहे. परिसरात स्वच्छतेसाठी 527 कामगार विविध संयंत्रांसह प्रत्येक सत्रात कार्यरत असतील. दर्शन रांग व मुख्य मार्गांवर एपूण 150 फिरती शौचालये, अभिवादन रांगेत 10, मैदान परिसरात 254 शौचालये, महिलांसाठी पिंक टॉयलेट्सची तसेच नळ व शॉवर सुविधेसह 284 तात्पुरत्या स्नानगृहांची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती अश्विनी जोशी यांनी दिली.
फिरते कॅमेरे, सीसीटीव्ही, हिरकणी कक्ष, भोजन…
सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, फिरते कॅमेरे, मेटल डिटेक्टर्स, बॅग स्पॅनर्स आदी, नियंत्रण कक्ष, निरीक्षण मनोरे आदी सुरक्षेच्या उपाययोजना केल्या असल्याचे उपायुक्त प्रशांत सपकाळे म्हणाले. शिवाय अग्निशमन वाहने, अतिदक्षता रुग्णवाहिका, दादर चौपाटी येथे बोट आदींची व्यवस्था आहे. तसेच मोबाईल चार्ंजग व संपूर्ण परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, अनुयायांसाठी बिस्कीट, भोजनाची व्यवस्थाही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
Comments are closed.