किरकोळ चलनवाढीचा दर 31.31१ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे

जानेवारीमधील दर : पाच महिन्यातील निचतम पातळी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अन्नपदार्थांच्या स्वस्त दरामुळे जानेवारीमध्ये किरकोळ महागाई दर 4.31 टक्के या गेल्या पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला आहे. ऑगस्टमध्ये महागाई दर 3.65 टक्के होता. तर डिसेंबरच्या सुरुवातीला महागाई दर 5.22 टक्के होता. बुधवार, 12 फेब्रुवारी रोजी सरकारने किरकोळ महागाईचे आकडे जाहीर केले. महागाईच्या दरात अन्नपदार्थांचा वाटा जवळपास 50 टक्के आहे.

महिना-दर-महिना आधारावर किरकोळ महागाई 8.39 टक्क्यांवरून 6.02 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. त्याचवेळी, ग्रामीण महागाई 5.76 टक्क्यांवरून 4.64 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. तसेच शहरी भागातील महागाई 4.58 टक्यांवरून 3.87 टक्के झाली आहे.

ऑक्टोबरमध्ये भारतातील किरकोळ महागाई 6.2 टक्के या 14 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचली होती. या कालावधीत अन्नधान्य महागाई दर 15 महिन्यांच्या उच्चांकी 10.9 टक्क्यांवर होती. आता जानेवारीमध्ये किरकोळ महागाईत घट झाल्यामुळे आरबीआयकडून पुन्हा एकदा धोरणात्मक दरात कपात होण्याची शक्यता वाढली आहे. फेब्रुवारीमध्ये रिझर्व्ह बँकेने जवळजवळ पाच वर्षांत प्रथमच रेपोदरात 25 बेसिस पॉइंटने कमी करून 6.25 टक्के केला होता. अर्थव्यवस्थेला चालना देणे हा यामागील महत्त्वाचा उद्देश आहे.

Comments are closed.