Retired judge to conduct judicial inquiry into Beed-Parbhani case
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या दोन्ही प्रकरणांची आता न्यायालयीन चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई (प्रेमानंद बचाव) : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि परभणीतील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला आहे. या दोन्ही प्रकरणांची आता न्यायालयीन चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Retired judge to conduct judicial inquiry into Beed-Parbhani case)
संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. याशिवाय संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा एसआयटी, सीआयडी आणि न्यायालयाच्या नेतृत्वात तपास सुरू आहे. तर दुसरीकडे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी न्याय मिळेपर्यंत मदत स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणाची नि:पश्चपातीपणे चौकशी होण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांकडून राज्यभर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. अशातच आता या दोन्ही प्रकरणांची न्यायालयीन चौकशी होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या समितीमार्फत, तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची माजी न्यायाधीश व्ही. एल. आचलिया यांच्या एक सदस्यीय समितीकडून चौकशी होईल. विशेष म्हणजे या दोन्ही समित्यांना चौकशीसाठी कोणाही व्यक्तीला बोलाविण्याचे अधिकार असतील. यासंदर्भातील शासन निर्णय आज, बुधवारी (15 जानेवारी) जारी करण्यात आला.
हेही वाचा – हत्येच्या दिवशी वाल्मीक कराडची संतोष देशमुखांना धमकी; न्यायालयात वकिलांचा दावा
न्या. ताहिलीयानी समितीकडून संतोष देशमुख हत्या प्रकरणी घडलेल्या घटनांचा क्रम, त्याची कारणे आणि परिणाम यांचा अभ्यास करण्यात येईल. या घटनेसाठी कोणी व्यक्ती अथवा संस्था प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष जबाबदार होती का, याचा तपास करण्यात येईल. अशी घटना पुन्हा होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलिसांनी करावयाच्या उपाययोजना देखील समिती सुचविणार आहे.
तीन ते सहा महिन्यात अहवाल येणार
दरम्यान, न्या. आचलिया समिती 10 डिसेंबर रोजी परभणीत घडलेला हिंसाचार तसेच सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करणार आहे. ही समिती देखील असे प्रकार घडू नयेत यासाठी उपाययोजना सुचविणार आहे. पुढील तीन ते सहा महिन्यात समितीने अहवाल सादर करणे अपेक्षित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात नागपूर हिवाळी अधिवेशनात बीड आणि परभणी प्रकरणी न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा केली होती.
हेही वाचा – मोदींकडून महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, गावागावात डब्बा पार्टी घेण्याचा दिला सल्ला
Comments are closed.