पुणे बाजार समितीच्या सेवेनिवृत्त वकीलाचे लाड थांबेनात, २५ लाखांचा फरक देऊनही आता कंत्राटीवर लाखोंचा पगार देण्याच्या हालचाली!

पुणे बाजार समितीचे विधी अधिकारी सुनिल जगताप यांनी अद्याप केबिन आणि खुर्ची सोडली नाही. संचालक मंडळाने विधी अधिकारी पद २०१५ मध्ये मंजुर झाले असताना १९९३ पासून तब्बल २२ ते २५ लाख रूपयांच्या दरम्यान फरक दिल्याचे समोर आले आहे. एवढ्यावर न थांबता आता मंगळवारी होणार्या संचालक मंडळाच्या बैठकीत जगताप यांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेऊन लाखो रूपयांचा पगार देण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे.
पुणे बाजार समितीत सेवानिवृत्ती नंतर संबंधित कर्मचार्यांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेतले जाते. संपुर्ण पुर्वीचे अधिकारी दिले जात नाहीत. सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी पध्दतीने प्रति महिना ६० हजार रूपयांच्या वर मानधन दिले जात नसताना संचालक मंडळाकडून मनमानी पध्दतीने ८५ हजार रूपयापर्यंत मानधन दिले जात आहे. विधी अधिकारी सुनिल जगताप हे ३१ ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यानंतरही जगताप हे आपल्या खुर्चीवर ठाण मांडून कायम आहेत. यासाठी बाजार समतीने जगताप यांना कोणतीही आर्डर दिली नसल्याचे समोर आले आहे. आता येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुन्हा जगताप यांना कंत्राटी पध्दतीने कामावर घेऊन लाखो रूपयांचा पगार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
संचालकांचा विरोध तरीही २५ लाखांचा फरक
सुनिल जगताप पुणे बाजार समितीत १९९३ साली कनिष्ठ लिपिक पदावर रूजू झाले. त्यानंतर त्यांना १२ वर्षानंतर ज्येष्ठ लिपिकाची वेतनश्रेणी मिळाली. २०१४ मध्ये बाजार निरिक्षकाची पदोन्नती मिळाली. त्यांनतर २०१५ मध्ये विधी अधिकारी पद निर्मिती झाली. मात्र, २०१७ मध्ये जगताप यांना विधी अधिकारी पद दिले. मात्र, संचालक मंडळाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत जगताप यांना पदनिर्मिती नसतानादेखील १९९३ पासून विधी अधिकारी पदाच्या वेतनश्रेणीचा सुमारे २२ ते २५ लाख रूपये फरक दिला. फरक देताना पणन संचालक अथवा जिल्हा उपनिबंधक यांची परवानगी घेतली नव्हती. याला ४ संचालकांनी विरोध केला होता. यामुळे संचालक मंडळ देखील अडचणीत सापडणार आहे.
नविन विधी अधिकारी पदासाठी भरती प्रक्रिया लवकर राबवली जाणार आहे. तोपर्यंत कंत्राटी पध्दतीने सेवा निवृत्त विधी अधिकार्यांना घेण्याचा विचार संचालक मंडळाचा असून तशी कार्यवाही सुरू आहे. – डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, बाजार समिती, पुणे.
विधी विभाग प्रमुख असताना जगताप यांनी बाहेरील वकीलांकडून कामे करून घेऊन लाखो रूपयांची बीले काढली. आता त्यांना पुन्हा दीड लाख रूपये पगार देऊन कंत्राटी पद्धतीने घेण्यापेक्षा एवढ्या रकमेत ३ वकील चांगले काम करू शकतात. तसेच सेवानिवृत्तीनंतर जगताप यांचा हिशोब देतेवेळी नियबाह्य पद्धतीने दिलेला बावीस लाखांचा फरक वसुल करावा. – प्रशांत काळभोर, संचालक, बाजार समिती, पुणे.
Comments are closed.