हरियाणात निवृत्त सुभेदाराची हत्या

दोन आरोपींना अटक

वृत्तसंस्था/ चरखी दादरी

हरियाणातील चरखी दादरी येथील डोहकी गावातील एका निवृत्त सुभेदाराची त्याच्या साथीदारासह त्याच गावातील एका व्यक्तीने गळा दाबून हत्या केली. हत्येनंतर अपघात असल्याचे भासवण्यासाठी आरोपींनी मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून देत घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी मृताचा मुलगा अनिल याच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. डोहकी गावातील निवृत्त सुभेदार मंगली राम यांचा मृतदेह पंतवास कलान आणि खुर्द गावांमधील रस्त्याच्या कडेला आढळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी सतवीर सिंग त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर तपासाची चक्रे फिरवत दोन्ही संशयित हल्लेखोरांना अटक केली आहे. दादरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला.

Comments are closed.