DSP Richa Ghosh – टीम इंडियाची फिनिशर दिसणार पोलिसांच्या वर्दीत, ममता सरकारनं डीएसपी पदावर नियुक्ती केली

नवी मुंबईतील डी.वाय. पाटील मैदानात हिंदुस्थानच्या महिलांनी इतिहास रचला आणि दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत पहिल्यांदाच वर्ल्डकप उंचावला. या वर्ल्डकपमध्ये यष्टीरक्षक बॅटर रिचा घोष हिने फिनिशरची भूमिका निभावली. तळाला येऊन अखेरच्या षटकांमध्ये तिने चौकार-षटकारांची आतषबाजी केली. अवघ्या 23 व्या वर्षी वर्ल्डकप जिंकलेल्या रिचावर कौतुकाचा वर्षाव होत असून आता तिची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारने शुक्रवारी ‘बांगा भूषण’ पुरस्कार देऊन तिचा गौरवही केला. बंगाल क्रिकेट असोसिएशनने कोलकातातील ईडन गार्डन्स येथे रिचाच्या सन्मानासाठी भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही उपस्थित होत्या. यावेळी रिचाची डीएसपी पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे आता टीम इंडियाला आणखी एक डीएसपी मिळाला असून मोहम्मत सिराज, दीप्ती शर्मानंतर आणखी एक खेळाडू पोलिसांच्या वर्दीत दिसणार आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.