विराट कोहलीबाबत रिचर्ड्सचं वक्तव्य, जे ऐकून वाढणार प्रत्येक भारतीयाचा अभिमान

क्रिकेटच्या इतिहासातील महान फलंदाजांचा उल्लेख झाला की वेस्ट इंडिजचा दिग्गज विवियन रिचर्ड्स यांचे नाव नक्कीच घेतले जाते. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर आणि विराट कोहली यांसारखे दिग्गजसुद्धा या खेळाडूचे चाहते आहेत. मात्र रिचर्ड्सदेखील वेळोवेळी या भारतीय दिग्गजांचे कौतुक करताना दिसतात. आता पुन्हा एकदा रिचर्ड्सने किंग कोहलीबद्दल असे विधान केले आहे, जे ऐकून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने उंचावेल.

वेस्टइंडिजचे दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनी सुपरस्टार विराट कोहलीचे कौतुक करताना सोशल स्पोर्ट क्रिकेटशी बोलताना म्हटलं,
“मला विराट कोहलीत स्वतःचा प्रतिबिंब दिसतो. तो पुढे येऊन नेतृत्व करतो, त्याच्यात एक जबरदस्त जिद्द आहे. त्याच्यात अशी ऊर्जा आहे जी मला सांगते की त्याला कुठलाही भीती नाही. जेव्हा मी अशा खेळाडूकडे पाहतो जो टीका करणाऱ्यांना सामोरा जातो, आणि तरीही स्पर्धा संपल्यानंतर यशस्वी ठरतो, ते माझ्यासाठी अप्रतिम वातावरण असतं. जरी तो विलक्षण प्रतिभा आणि कौशल्यांनी संपन्न आहे, तरी एक गोष्ट मला नक्की माहीत आहे. ती म्हणजे तो आपल्या कौशल्याला परिपूर्ण करण्याची इच्छाशक्ती कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त जपतो. हाच तो कारण आहे ज्यामुळे भारत त्याला एवढं प्रेम करतो.”

फक्त विवियन रिचर्ड्सच नाही तर विराट कोहलीदेखील त्यांना प्रचंड मान देतो. कोहलीने रिचर्ड्सना आपला हिरो असल्याचंही अनेकदा सांगितलं आहे. टी20 विश्वचषक 2024 दरम्यान रिचर्ड्स भारतीय ड्रेसिंग रूममध्ये जाऊन कोहलीला भेटले होते. वेस्टइंडिज दौर्‍यात सर विवियन रिचर्ड्स यांनी विराट कोहलीची मुलाखतही घेतली होती. मात्र कोहलीने आता टेस्ट आणि टी20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो आता फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसणार आहे. किंग कोहली 19 ऑक्टोबरला पुन्हा एकदा निळ्या जर्सीत झळकताना दिसू शकतो.

Comments are closed.