भारतातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे किती संपत्ती
भारतातील सर्वात श्रीमंत आणि गरीब सीएमएस: आतापर्यंत आपण अनेक व्यावसायिक व्यक्तिमत्त्वे आणि सेलिब्रिटींच्या संपत्तीबाबतची माहिती पाहिली आहे. पण आज आपण देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांबद्दल तसेच देशातील सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण याबाबतची माहिती पाहणार आहोत. भारतात मुख्यमंत्र्यांच्या मालमत्तेबद्दल अनेकदा चर्चा होते. एका अहवालात कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात जास्त मालमत्ता आहे आणि कोणाकडे सर्वात कमी मालमत्ता आहे हे सांगितले आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचा अहवाल प्रसिद्ध
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) च्या एका नवीन अहवालानुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देशातील सर्व राज्य प्रमुखांमध्ये सर्वात गरीब मुख्यमंत्री आहेत. त्यांची घोषित मालमत्ता 15 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. डिसेंबर 2024 नंतरच्या पोटनिवडणुकांसह मागील विधानसभा निवडणुकांदरम्यान मुख्यमंत्र्यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांवर आधारित ही माहिती आहे.
सप्टेंबर 2021 मध्ये भवानीपूर पोटनिवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्याकडे 69 हजार 255 रोख रक्कम आणि 13 लाख 5 हजार रुपये बँक बॅलन्स होता. त्यापैकी 1.5 लाख त्यांच्या निवडणूक खर्चाच्या खात्यात समाविष्ट होते. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 1.8 लाख रुपयांचा टीडीएस आणि 9 ग्रॅम वजनाचे दागिने, ज्यांचे मूल्य 43837 रुपये आहे, असे नमूद केले आहे. विशेष म्हणजे, प्रतिज्ञापत्रात त्यांच्या नावावर कोणत्याही जमिनीचा किंवा निवासी मालमत्तेचा उल्लेख नाही. तृणमूल काँग्रेस प्रमुखांच्या घोषित मालमत्तेत कालांतराने घट झाली आहे. 2020-21 च्या आयकर विवरणपत्रानुसार, बॅनर्जी यांची मालमत्ता 15.4 लाख रुपयांची होती. 2016 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान, त्यांची मालमत्ता 30.4 लाख रुपयांची होती.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू हे 931 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्तीसह सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री असल्याची माहिती असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालात दिली आहे.
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांचा दुसरा क्रमांक
अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू 332 कोटी रुपयांच्या घोषित संपत्तीसह यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत. टीओआयच्या अहवालानुसार, 31 मुख्यमंत्र्यांमध्ये हे दोघेच एकमेव अब्जाधीश आहेत. एडीआरच्या अहवालानुसार, 31 मुख्यमंत्र्यांची एकत्रित संपत्ती सुमारे 1 हजार 630 कोटी रुपये आहे.
जम्मू आणि काश्मीरचे ओमर अब्दुल्ला यांची मालमत्ता 55 लाख रुपयांची आहे, तर केरळचे पिनारायी विजयन यांची मालमत्ता 1 कोटी रुपयांपेक्षा थोडी जास्त आहे. गरीब मुख्यमंत्र्यांच्या यादीत ओमर अब्दुल्ला यांचा तिसरा तर केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांचा चौथा क्रमांक लागतो.
योगी आदित्यनाथ यांच्याकडे किती संपत्ती?
योगी आदित्यनाथ यांनी 2022 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या एकूण मालमत्तेची किंमत 1 54 94 054 रुपये असल्याचे जाहीर केले होते. यामध्ये रोख रक्कम, सहा बँक खात्यांमधील शिल्लक रक्कम आणि बचत यांचा समावेश आहे. त्यांच्याकडे 12000 रुपयांचा सॅमसंग मोबाईल फोन, 100000 रुपयांची रिव्हॉल्व्हर आणि 80000 रुपयांची रायफल आहे. प्रतिज्ञापत्रात असेही म्हटले आहे की उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांकडे 49000 रुपये किमतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, 20000 रुपये किमतीचे 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे साखळी आणि रुद्राक्षाची माळा आहे. त्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये 1320653 रुपये, आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 1568799 रुपये, आर्थिक वर्ष 2018-19 मध्ये 1827639 रुपये आणि आर्थिक वर्ष 2017-18 मध्ये 1438670 रुपये उत्पन्न घोषित केले होते. मुख्यमंत्री योगी यांच्याकडे कोणतीही कृषी किंवा बिगरशेती मालमत्ता नाही. त्यांच्या नावावर कोणतेही वाहन नोंदणीकृत नाही आणि त्यांच्यावर कोणतेही दायित्व नाही.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची संपत्ती किती?
रेखा गुप्ता यांनी 20 फेब्रुवारी 2025 रोजी दिल्लीच्या नवव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी 5.31 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची मालमत्ता जाहीर केली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि मायनेटाने दिलेल्या वृत्तानुसार, त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्यावर सुमारे 1.20 कोटी रुपयांचे कर्ज आहे. रेखा गुप्ता यांनी कोणतीही व्यावसायिक मालमत्ता जाहीर केलेली नाही आणि त्यांच्या निवासी इमारतींची किंमत 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. त्यांनी व्यावसायिक काम, शेअर ट्रेडिंग आणि व्याज उत्पन्न हे त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत म्हणून घोषित केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
भारतातील सर्वात श्रीमंत 10 कुटुंबे कोणती? नवीन यादी जाहीर, जाणून घ्या सविस्तर माहिती
आणखी वाचा
Comments are closed.