रोहित-विराट दिग्गजांच्या यादीतून बाहेर! रिकी पाँटिंगच्या विधानाने खळबळ
ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग (Riki ponting) यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी जगातील 5 महान फलंदाजांची नावे जाहीर केली, पण विशेष म्हणजे या यादीत त्यांनी रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) यांचा समावेश केलेला नाही. एवढंच नव्हे तर स्टीव्ह स्मिथलाही (Steve Smith) त्यांनी आपल्या लिस्टमध्ये जागा दिली नाही. मात्र माजी कर्णधाराने दोन भारतीय फलंदाजांना जगातील महान बॅट्समन म्हटले आहे.
रिकी पाँटिंग यांनी आपल्या लिस्टमध्ये ब्रायन लारा, केन विल्यमसन, जो रूट, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांची निवड केली आहे. त्यांनी ब्रायन लाराला सर्वात कुशल फलंदाज म्हटले. तसेच आधुनिक खेळाडूंमध्ये जो रूट आणि केन विल्यमसनचा उल्लेख केला. ब्रायन लाराबद्दल पाँटिंग म्हणाले, लारा हा माझ्या विरोधात खेळलेला सर्वात टॅलेंटेड फलंदाज होता. मी कर्णधार असताना त्याने माझ्या रात्रीची झोप उडवली होती. सचिनबद्दल ते म्हणाले की, तांत्रिकदृष्ट्या तो माझ्या पाहण्यातला सर्वोत्तम होता. याशिवाय त्यांनी जॅक कॅलिसला जगातील सर्वात महान क्रिकेटपटू म्हटले.
पाँटिंग यांच्या मते, बेन स्टोक्स हा अत्यंत दमदार खेळाडू आहे. कठीण प्रसंगी उत्तम कामगिरी करण्यात तो पारंगत आहे. ते म्हणाले, स्टोक्स हा अवघड प्रतिस्पर्धी आहे. आकडेवारी त्याला पूर्णपणे परिभाषित करत नाही. परिस्थिती कितीही कठीण असो, तो आपल्या सर्वोत्तम खेळात असतो. महान खेळाडूंबद्दल बोलताना त्यांच्या खेळावरच्या प्रभावाबद्दलही बोलणे गरजेचे आहे.
रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी आणि टी-20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. IPL 2025 नंतर रोहित आणि विराट मैदानात दिसलेले नाहीत.
Comments are closed.