रिंकू सिंगचं टी-20 विश्वचषक 2026 खेळण्याचं स्वप्न भंगणार? या दिग्गजाने अप्रत्यक्षपणे केली मोठी भविष्यवाणी
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या टी-20 (T20 Series in between IND vs SA) मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघात रिंकू सिंगला (Rinku Singh) जागा मिळाली नाही. रिंकू गेल्या बऱ्याच काळापासून भारताच्या टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग होता. मात्र, 2026 टी-20 विश्वचषकापूर्वी (World Cup) रिंकूला कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय संघातून वगळण्याचा हा निर्णय सगळ्यांसाठी धक्कादायक ठरला आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही रिंकूला आपली क्षमता दाखवण्याची फारशी संधी मिळाली नव्हती. याच दरम्यान, माजी खेळाडू इरफान पठाणने (Irfan Pathan) अप्रत्यक्षपणे सांगितले आहे की, हार्दिक पांड्याच्या (Hardik pandya) संघात परतण्याने रिंकूचे विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न भंगू शकते.
इरफान पठाणने आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना सांगितले की, हार्दिक पांड्या परत आला आणि याच कारणामुळे रिंकू सिंहला बाहेर करण्यात आले आहे. रिंकू अनलकी ठरला, पण हार्दिक पूर्णपणे फिट झाल्यावर हे होणारच होते. हा जो सध्याचा संघ निवडला आहे, तो 90 ते 95 टक्के 2026 टी-20 विश्वचषकात खेळेल. रिंकूला ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेतही फक्त एकाच सामन्यात संधी मिळाली होती. तसेच, 2025 च्या आशिया चषकातही हार्दिक बाहेर झाल्यानंतर त्याला अंतिम सामन्यात खेळायला मिळाले होते.
रिंकू सिंगची गणना दमदार फिनिशर्समध्ये केली जाते. त्याने आपल्या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिले आहेत. रिंकूने भारतासाठी आतापर्यंत 35 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या काळात त्याने 161 च्या स्ट्राइक रेटने 550 धावा केल्या आहेत. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये तीन अर्धशतके (Three Fifties) झळकावली आहेत आणि त्याची सर्वाधिक धावसंख्या 69 धावा आहे. मात्र, रिंकूचे शेवटचे टी-20 शतक एक वर्षापूर्वी आले होते. पण सत्य हे देखील आहे की, मागील अनेक मालिकांमध्ये रिंकूला संघात (Squad) ठेवले गेले, पण प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing 11) खेळण्याची संधी मिळाली नाही.
Comments are closed.