KKR vs SRH: रिंकू सिंगने आयपीएलमध्ये रचला इतिहास! मोठ्या दिग्गज खेळाडूंनाही टाकलं मागे
कोलकाता नाइट रायडर्सच्या (KKR) रिंकू सिंगने (Rinku Singh) इंडियन प्रीमियर लीगमध्ये एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. आयपीएलच्या इतिहासात केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेणारा तो आता पहिल्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात अनिकेत वर्माचा झेल पकडताच त्याने हा टप्पा गाठला. केकेआरसाठी हा त्याचा 41 वा झेल होता.
गुरुवारी हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात रिंकूने आधी ईशान किशनचा झेल घेतला आणि त्यानंतर अनिकेत वर्माला बाद करण्यात मोलाचे योगदान दिले. या दोन झेलसह रिंकूच्या नावावर आता 41 झेल झाले आहेत. यापूर्वी हा रेकॉर्ड आंद्रे रसेलच्या नावावर होता, ज्याने 40 झेल घेतले होते.
केकेआरसाठी सर्वाधिक झेल घेणारे खेळाडू
४१ – रिंकू सिंग
40 – आंद्रे रसेल
३६ – सुनील नरेन
३० – मनोज तिवारी
रिंकू सिंग आतापर्यंत फक्त कोलकाता नाइट रायडर्ससाठीच खेळला आहे. त्याने 60 सामन्यांत 145. 50 च्या स्ट्राईक रेटने 1,132 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये एकाच संघासाठी सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रम कायरन पोलार्डच्या नावावर आहे. पोलार्डने 2010 ते 2022 या काळात मुंबई इंडियन्ससाठी खेळताना एकूण 103 झेल घेतले होते.
Comments are closed.