Asia Cup: रिंकू सिंग मैदानात, बुमराहला आराम? बांग्लादेशविरुद्ध टीम इंडियाची प्लेइंग 11 बदलणार

आशिया कप 2025 स्पर्धेमध्ये (Asia Cup 2025) टीम इंडियासाठी (Team india) सगळं ठीक चाललं आहे. सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वाखाली भारतीय संघाचा विजयाचा रथ सुरू आहे. सुपर 4 राउंडची सुरुवातही सूर्या आणि त्याच्या टीमने पाकिस्तानला 6 विकेटने हरवून केली. आता टीम इंडियाची पुढचा सामना बांग्लादेशविरुद्ध आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल होऊ शकतात.

रिंकू सिंगला (Rinku Singh) प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाऊ शकते. यासोबतच, जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) आराम दिला जाईल का आणि त्याऐवजी अर्शदीप सिंगला (Arshdeep Singh)संधी मिळेल का? बुमराहची मागील सामन्यात काही खास कामगिरी नव्हती. त्याने 4 षटकांमध्ये 45 धावा दिल्या होत्या.

बांग्लादेशविरुद्ध रिंकूला खेळण्याची संधी मिळू शकते. आतापर्यंत रिंकुला या स्पर्धेत कौशल्य दाखवण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे संघ व्यवस्थापन रिंकूला फिनिशर म्हणून वापरण्याचा विचार करू शकते.

त्याचबरोबर, जसप्रीत बुमराहला आराम दिला जाऊ शकतो. तर त्याऐवजी अर्शदीप सिंगला खेळण्याची संधी मिळू शकते. अर्शदीपने आतापर्यंत या स्पर्धेत फक्त ओमानविरुद्ध एक सामनाच खेळला आहे.

आशिया कपच्या इतिहासात भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN) यांच्यात आतापर्यंत 15 सामने झाले आहेत. त्यापैकी 13 सामने भारताने जिंकले आहेत, तर फक्त 2 सामने बांग्लादेशने जिंकले आहेत. तरीही, बांग्लादेश अचानक उलटफेर करू शकतो, त्यामुळे सूर्या आणि त्याच्या टीमने सतर्क राहावे लागेल.

बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11:
अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल/रिंकू सिंग, शिवम दुबे, वरुण चक्रवर्ती, कुल्दीप यादव, जसप्रीत बुमरा/अरशदिप

Comments are closed.