IPL 2025; लखनऊ सुपर जायंट्सला मिळाला नवा कर्णधार, संघ मालकाची मोठी घोषणा

आयपीएल 2025 च्या हंगामीपूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने रिषभ पंतची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. आगामी आयपीएल मेगा लिलावात लखनऊने रिषभ पंतला विक्रमी बोली लावत 27 कोटी रुपयांना विकत घेतले होते. लखनऊने लावलेली बोली पाहता त्यावेळी स्पष्ट झाले होते की, येत्या हंगमात रिषभ पंतला कर्णधारपदाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आज (20 जानेवारी) कोलकाता येथे मीडियाशी बोलताना संजीव गोएंका यांनी ही घोषणा केली.

लखनऊ सुपर जायंट्सने याआधीच संघाच्या मेंटाॅरपदी भारतीय माजी वेगवान गोलंदाज झहीर खानची निवड केली होती. यानंतर झहीर खानच्या नेतृत्वाखाली टीम मॅनेजमेंटने आयपीएल मेगा लिलावात चांगली कामगिरी केली. संघाने निकोलस पूरन, रवी बिश्नोई, मयंक यादव, आयुष बदोनी आणि मोहसिन खान यांना रिटेन केले होते. तर डेव्हिड मिलर, मिशेल मार्श आणि एडेन मार्कराम तसेच भारतीय वेगवान गोलंदाज आकाश दीप आणि अवेश खान यांच्यासाठी यशस्वी बोली लावली.

रिषभ पंतच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, लखनऊपूर्वी पंत दिल्ली कॅपिटल्सचा भाग होता. पंतने 2016 मध्ये दिल्ली फ्रँचायझीसाठी आयपीएलमध्ये पदार्पण केला होता. आयपीएलमध्ये आतापर्यंत त्याने 111 सामन्यांमध्ये 35.31 च्या सरासरीने 3284 धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि 18 अर्धशतकांचा समावेश आहे. पंतने 43 आयपीएल सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. त्यापैकी 23 सामने जिंकले आहेत तर 19 सामने गमावले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला.

लखनऊचा हा संघ 2024 च्या हंगामात सातव्या स्थानावर राहिला होता. आयपीएल 2025 पूर्वी, 10 पैकी 7 फ्रँचायझींनी त्यांचे कर्णधार जाहीर केले आहेत. ज्या संघांचे कर्णधार अद्याप जाहीर झालेले नाहीत त्यात केकेआर, आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स यांचा समावेश आहे.

हेही वाचा-

IND VS ENG; ‘जियो किंवा सोनी’वर नाही, या ठिकाणी पाहा लाइव्ह सामना
मोहम्मद शमी पूर्णपणे तंदुरुस्त? सरावादरम्यान गुडघ्याला बांधली पट्टी; पाहा VIDEO
‘आम्ही आमचे सर्वोतपरी…’, कॅप्टन रोहित शर्माने घेतला चॅम्पियन्स ट्राॅफी भारतात आणण्याचा निर्धार!

Comments are closed.