रिषभ पंतने रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय फलंदाज
षभ पंत इतिहास: भारतीय यष्टीरक्षक डावखुरा फलंदाज रिषभ पंतने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या डावात शतक झळकावून इतिहास रचला आहे. पंत इंग्लंडच्या भूमीवर एका कसोटीच्या दोन्ही डावात शतक (Two Centuries in One Test) झळकावणारा भारताचा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे. (First Indian Wicketkeeper with Two Centuries) त्याच्या आधी कोणीही हा पराक्रम केला नव्हता. पंतने दोन्ही डावात आपल्या खास शैलीत फलंदाजी केली आणि इंग्लंडच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
पंतने पहिल्या डावात 126 चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले होते, त्याने 134 धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. आता दुसऱ्या डावातही पंतने शतक झळकावले आहे. दुसऱ्या डावात पंतने 100 धावा पूर्ण करण्यासाठी 130 चेंडू घेतले. या डावात त्याने 2 षटकारांसह 13 चौकार लगावले. या शतकामुळे पंतने 4 दिग्गजांना मागे टाकले आहे. (Most Test Centuries Wicketkeepers)
पंत या शतकासह जगात सर्वाधिक शतके झळकावणारा चौथा यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे. त्याने कारकिर्दीतील 8 वे कसोटी शतक झळकावले बीजे वाटलिंग, कुमार संगकारा, मॅट प्रॉयर, एबी डिविलियर्स, यांसारख्या 7 शतके असलेल्या दिग्गजांना मागे टाकले आहे. यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून कसोटीत सर्वाधिक शतकांचा रेकाॅर्ड ऑस्ट्रेलियाचा दिग्गज ॲडम गिलख्रिस्टच्या (Adam Gilchrist) नावावर आहे, ज्याने 17 शतके झळकावली आहेत.
रिषभ पंत इंग्लंड दौऱ्यावर उपकर्णधार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत त्याने समजदारीने आणि जबाबदारीने फलंदाजी केली. पहिल्या डावात त्याने गिलसोबत 100 हून अधिक धावांची भागीदारी केली होती, तर दुसऱ्या डावात केएल राहुलसोबत 150 हून अधिक धावांची भागीदारी केली.
पंत भारताचा असा पहिला यष्टीरक्षक-फलंदाज बनला आहे, ज्याने इंग्लंडच्या भूमीवर देशासाठी दोन्ही डावांत शतक झळकावले आहे. (First Indian Wicketkeeper Double Century Test) पंतच्या आधी भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असे कोणीही केले नव्हते. आतापर्यंत 7 भारतीय खेळाडूंनी कसोटीच्या दोन्ही डावांत हा पराक्रम केला आहे. यापैकी सुनील गावस्करने 3 वेळा ही कमाल केली आहे, तर राहुल द्रविडने 2 वेळा अशी कामगिरी केली आहे. (Rishabh Pant Historic Record)
Comments are closed.