आयसीसी टेस्ट क्रमवारीत पंतला फायदा! एडेन मार्करम पोहोचला टॉप 10च्या उंबरठ्यावर
2025 च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर, नवीन आयसीसी कसोटी क्रमवारी जाहीर झाली आहे. या सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या काही खेळाडूंना फार फायदा झालेला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजांना मोठे नुकसान झाले आहे. नवीन भारतीय उपकर्णधार रिषभ पंतला देखील क्रमवारीत फायदा झाला आहे. या बदलांनंतर, टॉप 10 रँकिंगमध्ये मोठा बदल झाला आहे. स्टार फलंदाज एडेन मार्करामनेही टॉप 10 मध्ये स्थान मिळवले आहे.
अंतिम सामन्यानंतरही इंग्लंडचा जो रूट अव्वल स्थानावर दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ अजूनही पाचव्या स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा सहाव्या स्थानावर आहे. भारताच्या यशस्वी जयस्वालनेही आपले चौथे स्थान कायम ठेवले आहे. यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत एका स्थानाच्या आघाडीने 8 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर आता पाकिस्तानचा सौद शकील 9 व्या स्थानावर आणि न्यूझीलंडचा डॅरिल मिशेल 10 व्या स्थानावर दिसत आहे. एडेन मार्कराम आता 7 स्थानांच्या आघाडीने 11 व्या स्थानावर पोहोचला आहे. ट्रॅव्हिस हेड आता 4 स्थानांनी मागे म्हणजेच 12 व्या स्थानावर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा 6 स्थानांनी मागे म्हणजेच 15 व्या स्थानावर पोहोचला आहे.
गोलंदाजी क्रमवारीत जसप्रीत बुमराह अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. कागिसो रबाडा दुसऱ्या क्रमांकावर आहे तर पॅट कमिन्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा नोमान अली आता 2 स्थानांनी पुढे चौथ्या क्रमांकावर पोहोचला आहे. जोश हेझलवूड आणि नाथन लायन 1-1 स्थानांनी घसरले आहेत. आता मिचेल स्टार्क 1 स्थानाच्या वाढीसह टॉप 10 मध्ये प्रवेश करतो. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत कोणताही मोठा बदल झालेला नाही. रवींद्र जडेजा पहिल्या क्रमांकावर आला आहे. मिचेल स्टार्कने येथेही 3 स्थानांच्या वाढीसह टॉप 10 मध्ये प्रवेश केला आहे.
Comments are closed.