IND vs SL: कसोटी रँकिंगमध्ये ऋषभ पंतची मोठी झेप! भारतीय फलंदाजांमध्ये पोहोचला अव्वल स्थानी

टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंतने (Rishbh Pant) कसोटी रँकिंगमध्ये मोठी झेप घेतली आहे. बुधवारी (26 ऑगस्ट) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) ताजी रँकिंग जाहीर केली. यात सर्वांचे लक्ष मिचेल स्टार्कवर (Mitchell Starc) होते, ज्याने जसप्रीत बुमराहला (Jasprit Bumrah) मागे टाकत नंबर-1 कसोटी गोलंदाज स्थान पटकावले.
यादरम्यान, रँकिंगमध्ये ऋषभ पंतलाही मोठा फायदा झाला असून तो कसोटी रँकिंगमध्ये भारताकडून सर्वोच्च स्थानावर पोहोचला आहे. म्हणजेच पंतच्या वर आता एकही भारतीय फलंदाज नाही. या विकेटकीपर फलंदाजाने 6 स्थानांची झेप घेत थेट सातवे स्थान पटकावले आहे. त्याची 711 रेटिंग आहे.
भारताचा कसोटी कर्णधार शुबमन गिल (Captain Shubman gill) देखील 711 रेटिंगसह सातव्या क्रमांकावरच आहे. पंत आणि गिल हे दोघेच सध्या रँकिंगच्या टॉप-10 मध्ये असलेले भारतीय खेळाडू आहेत. मात्र, टॉप-5 मध्ये एकही भारतीय फलंदाज नाही. इंग्लंडचा हॅरी ब्रूक (Harry Brook) 874 रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहे. भारतासाठी पंत सातत्याने कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करत आहे. श्रीलंका मालिकेतील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावांत पंतने अनुक्रमे 39 आणि 66 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्याच्या पहिल्या डावातही त्याची बॅट चालली, जिथे त्याने 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 63 धावा केल्या.
त्यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीच्या एका डावात त्याने 81 धावा केल्या होत्या. त्यामुळे कसोटी सामन्यांमध्ये तो सातत्याने धावा करत आहे. पंतच्या कसोटी कारकिर्दीवर नजर टाकल्यास, त्याने या फॉरमॅटमध्ये 52 सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 90 डावांत फलंदाजी करताना त्याने 43.82 च्या सरासरीने 3,725 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 8 शतके आणि 21 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यामध्ये 159 धावांची त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. पंतने ऑगस्ट 2018 मध्ये कसोटी पदार्पण केले होते. आता त्याने 50 कसोटी सामन्यांचा टप्पा ओलांडला असून तो कसोटीत भारताचा मुख्य यष्टीरक्षक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
Comments are closed.