बुमराह कर्णधार बनला तर उपकर्णधार कोण होणार? हे दोन खेळाडू शर्यतीत

गेल्या काही काळापासून कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाची कामगिरी खूपच निराशाजनक राहिली आहे. गेल्या 6 महिन्यात टीम इंडियाला घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपचा सामना करावा लागला आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीही गमवावी लागली. आता भारताचं कसोटीतील पुढील आव्हान इंग्लंडचा दौरा आहे, जो 20 जूनपासून सुरू होईल. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, भारतीय संघात काही मोठे बदल होऊ शकतात, त्यापैकी एक म्हणजे नेतृत्व गट.

आतापर्यंत कर्णधार असलेल्या रोहित शर्माला आता कसोटी संघात संधी मिळणार नाही, असं मानलं जात आहे. सिडनी कसोटीत रोहित बाहेर बसल्यानंतर संघाचं नेतृत्व करणारा जसप्रीत बुमराह त्याची जागा घेण्यासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र बुमराहचा उपकर्णधार कोण असेल याबद्दलही चर्चा सुरू आहेत. यामध्ये रिषभ पंतसह यशस्वी जयस्वालचं नाव समोर येत आहे.

जसप्रीत बुमराहनं जेव्हा जेव्हा भारतीय संघाचं नेतृत्व केलं, तेव्हा त्यानं दाखवून दिलं की त्याच्यात नेतृत्व करण्याची क्षमता आहे. याचं सर्वात मोठं उदाहरण पर्थमध्ये पाहायला मिळालं, जिथे भारतानं बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला होता.

मात्र जसप्रीत बुमराहला दीर्घकाळ कर्णधार बनवण्याच्या निर्णयात सर्वात मोठा अडथळा येत आहे त्याच्या फिटनेसचा. बुमराह अनेकदा दुखापतग्रस्त होतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाचव्या कसोटीतही तो दुखापतग्रस्त झाला. ज्यामुळे दुसऱ्या डावात तो एकही ओव्हर टाकू शकला नाही. आता कदाचित तो पाठीच्या दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधूनही बाहेर पडला आहे.

जर बुमराह इंग्लंड दौऱ्यापर्यंत तंदुरुस्त झाला आणि त्यानं कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली, तर त्याला उपकर्णधाराचीही आवश्यकता भासेल. अशा परिस्थितीत बुमराहला पाठिंबा देण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतचं नाव समोर येत आहे, यासोबतच या शर्यतीत यशस्वी जयस्वालही सामील झाला आहे.

वृत्तानुसार, जसप्रीत बुमराह कसोटी कर्णधार बनल्यानंतर रिषभ पंत किंवा यशस्वी जयस्वाल यांना उपकर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. सध्या यासाठी पंतचा दावा अधिक मजबूत आहे.

हेही वाचा –

अस्सल मातीतील खेळ! खो-खो विश्वचषकाला आजपासून सुरुवात; कधी आणि कुठे पाहायचा लाईव्ह सामना?
“मी कपिल देवला मारायला निघालो होतो”, माजी क्रिकेटपटूचा खळबळजनक खुलासा
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियन संघ जाहीर, डेव्हिड वॉर्नरच्या जागी या खेळाडूची निवड

Comments are closed.