टी20 मालिकेत निवड झाली नाही म्हणून या संघाकडून खेळणार रिषभ पंत, चॅम्पियन्स ट्राॅफीपूर्वी मोठा निर्णय
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत 1-3 असा पराभव स्वीकारावा लागला. यानंतर, बीसीसीआयने सर्व वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास सांगितले. तसेच माजी खेळाडू सुनील गावस्कर आणि रवी शास्त्री यांनाही भारतीय संघाकडून खेळणाऱ्या खेळाडूंनी रेड बॉल फॉरमॅटमध्ये देशांतर्गत क्रिकेट खेळावे अशी इच्छा आहे. आता रिषभ पंतने एक मोठा निर्णय घेतला आहे आणि दिल्ली संघाच्या वतीने रणजी ट्रॉफी सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे.
दिल्ली क्रिकेट संघ 23 जानेवारीपासून रणजी ट्रॉफीमध्ये राजकोटमध्ये सौराष्ट्र विरुद्ध खेळणार आहे. यानंतर, दिल्लीला 30 जानेवारी रोजी रेल्वे संघाविरुद्ध सामना खेळायचा आहे. पाच सामन्यांतून 14 गुणांसह दिल्ली गट ड मध्ये चौथ्या स्थानावर आहे. रिषभ पंतने दिल्लीच्या पहिल्या सामन्यासाठी स्वतःला उपलब्ध असल्याचे जाहीर केले आहे आणि दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव अशोक शर्मा यांनी स्वतः ही माहिती दिली. पंतने 2017-18 च्या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून शेवटचा सामना खेळला होता.
ऋषभ पंत पुढील फेरीचा रणजी सामना दिल्लीकडून खेळणार आहे. (कुशन सरकार/पीटीआय). pic.twitter.com/H2CxGW1eSl
— मुफद्दल वोहरा (@mufaddal_vohra) 14 जानेवारी 2025
अशोक शर्मा यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, रिषभ पंतने पुढील रणजी सामन्यासाठी त्याची उपलब्धता निश्चित केली आहे आणि तो थेट राजकोटमध्ये संघात सामील होईल. आम्हाला विराट कोहलीनेही खेळावे असे वाटते, पण आम्हाला त्याची प्रतिक्रिया मिळालेली नाही. हर्षित राणाची भारतीय टी20 संघात निवड झाली आहे. त्यामुळे तो उपलब्ध राहणार नाही. पंत आणि विराट यांचा दिल्लीच्या संभाव्य खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. जे सामान्य आहे कारण अंतिम निर्णय फक्त या दोन खेळाडूंनीच घ्यायचा आहे. शुबमन गिल आणि यशस्वी जयस्वाल हे देखील आपापल्या राज्य संघांकडून खेळतील अशी अपेक्षा आहे.
रिषभ पंतने आतापर्यंत एकूण 68 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 4868 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 11 शतके आणि 24 अर्धशतके झळकावली आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 308 धावा आहे. त्याच्या नावावर 67 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 1789 धावा आहेत. त्याने लिस्ट-ए क्रिकेटमध्ये दोन शतके आणि 11 अर्धशतके झळकावली आहेत.
हेही वाचा-
भारताचा ‘हा’ स्टार खेळाडू रणजी ट्राॅफी खेळण्यासाठी सज्ज
भारतीय संघानंतर गौतम गंभीरच्या कोचिंगचाही आढावा घेणार बीसीसीआय
जसप्रीत बुमराहची हवा, जिंकला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार…!
Comments are closed.