LSG vs SRH: ऋषभ पंतचा ब्लॉकबस्टर शो! सुपरमॅन बनून टिपले अफलातून झेल, पाहा व्हिडिओ
आयपीएल (IPL 2026) स्पर्धेच्या 10 व्या सामन्यात ऋषभ पंतची (Rishbh pant) जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली. त्याने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दोन अविश्वसनीय झेल टिपले आणि फलंदाजीतही आपली लय राखली.
हैदराबादसाठी पदार्पण करणाऱ्या लियाम लिविंगस्टनचा पंतने अफलातून झेल घेतला. पॉवरप्लेमध्ये 3 विकेट्स गेल्यावर हैदराबादला लिविंगस्टनकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. 8 व्या षटकामध्ये दिग्वेश राठीच्या चेंडूवर लिविंगस्टनने ‘पॅडल’ शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पंतने हे ओळखून लेग साईडच्या दिशेने धाव घेतली आणि पुढच्या बाजूला डायव्ह मारून एका हाताने शानदार झेल टिपला. यामुळे हैदराबादची चौथी विकेट केवळ 26 धावांवर पडली.
हैदराबादचा स्फोटक फलंदाज हेनरिक क्लासेन 62 धावांवर खेळत असताना पंतने त्याचा दुसरा महत्त्वाचा झेल घेतला. 19 व्या षटकात क्लासेनने ‘रिव्हर्स स्कूप’ मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बॅटची कडा घेऊन मागे गेला. पंतने हवेत उडी मारत (डायव्ह लावून) जबरदस्त कॅच पकडला. क्लासेन बाद झाल्यामुळे हैदराबादला शेवटच्या 11 चेंडूत फक्त 12 धावाच करता आल्या. जर तो खेळत राहिला असता, तर हैदराबादने 20-25 धावा अधिक केल्या असत्या आणि लखनऊसाठी विजय कठीण झाला असता.
शानदार फिल्डिंगनंतर ऋषभ पंतने फलंदाजीतही आपली ताकद दाखवली. विजयाचा पाठलाग करताना त्याने 50 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी केली. लखनऊने 1 चेंडू राखून हा सामना जिंकला.
पंतची कामगिरी उत्तम असली, तरी मोहम्मद शमीला (Mohmmed Shami) ‘प्लेअर ऑफ द मॅच’चा पुरस्कार देण्यात आला. शमीने आपल्या 4 षटकामध्ये केवळ 9 धावा देऊन 2 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. त्याने पॉवरप्लेमध्येच अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड यांसारख्या धोकादायक फलंदाजांना बाद करून हैदराबादची कंबर मोडली होती.
Comments are closed.