11 पैकी 6 सामने हरणारी टीम आता प्लेऑफमध्ये? काय आहे रिषभ पंतचा गेमप्लॅन?
लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा अजून जिवंत आहेत. आयपीएल पॉईंट्स टेबलमध्ये लखनऊ सातव्या स्थानावर आहे. 4 मे रोजी पंजाब विरुद्ध लखनऊला जोरदार पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पंजाबने लखनऊचा 37 धावांनी पराभव केला. हा सामना पराभूत झाल्यानंतर लखनऊचा कर्णधार रिषभ पंतने अजून पराभव पत्करलेला नाही. पण मास्टर प्लॅन घेऊन प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून आहे.
लखनऊ सुपर जायंट्स या हंगामात त्यांनी आतापर्यंत 11 सामने खेळले आहेत. या 11 सामन्यांमध्ये त्यांनी 6 सामन्यात पराभव पत्करलेला आहे. तसेच 5 सामने जिंकून 10 गुण मिळवलेले आहेत, ज्या अंतर्गत ते पॉइंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहेत. लखनऊचे आणखी 3 सामने उरले आहेत. जर त्यांना प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर त्यांना येणारे तीनही सामने जिंकावे लागतील.
लखनऊचा कर्णधार रिषभ पंत प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी अजूनही तयार आहे. त्याचं म्हणणं आहे की, बाकीच्या राहिलेल्या तीन सामन्यांमध्ये संघ पुनरागमन करू शकतो. पंजाब विरुद्ध पराभवानंतर रिषभ पंतच स्वप्न अजूनही जिवंत आहे. जर त्यांनी येणारे तीनही सामने जिंकले तर परिस्थिती बदलू शकते.
रिषभने पंजाब विरुद्ध पराभवानंतर म्हटले, सामन्यात आम्ही त्यांना खूप धावा दिल्या. सामन्याच्या शेवटच्या क्षणी कॅच सोडल्यामुळे आम्हाला पराभव पत्करावा लागला. आम्ही या सामन्यात सुरुवात चांगली केली नाही, पण हे सगळं होतच राहतं.
Comments are closed.