Road Accident in last 3 years death toll rises


मुंबई : गेल्या काही काळापासून रस्ते अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. अशामध्ये समोर आलेली आकडेवारी ही धक्कादायक आहे. गेल्या 3 वर्षांत म्हणजेच 2022 ते 2024 या कालावधीत राज्यात एकूण 95, 150 रस्ते अपघात झाले आहेत. यामध्ये सुमारे 41, 612 लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. राज्य परिवहन विभागाने (RTO) ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये 45 युनिटच्या माध्यमातून आकडेवारी समोर आली आहे, ज्यामध्ये मृत्यूचे प्रमाण हे साधारण 43.73 टक्के आहे. (Road Accident in last 3 years death toll rises)

हेही वाचा : PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई, नवी मुंबई दौऱ्यावर; वाहतुकीत केले हे बदल 

गेल्या 3 वर्षांत रस्ते अपघाताचे प्रमाण वाढले असून सुरक्षिततेबाबत अनेक सवाल उपस्थिती करण्यात येत आहेत. मुंबईमधील आकडेवारी पाहिली तर, 2024मध्ये मुंबई आणि उपनगरीय क्षेत्रात 4,935 रस्ते अपघात झाले आहेत. यामधील 2, 319 रस्ते अपघातांची नोंद ही फक्त मुंबईत झाली आहे. मुंबईकरांसाठी ही आकडेवारी धक्कादायक आहे. तर, मुंबई महानगर प्रदेशात झालेल्या अपघातांमध्ये 1,108 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या कालावधीत राज्यामध्ये तब्बल 32,801 रस्ते अपघातांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये 13, 823 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच, या आकडेवारीमधून राज्यातील 64 टक्के मृत्यू हे दुचाकीवर स्वार असणाऱ्या मागे बसलेल्या लोकांचेच होतात, असे निदर्शनास आले. तसेच त्यापैकी 80 टक्के प्रकरणात विना हेल्मेटचे असल्याचे समोर आले.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मागील हिवाळी अधिवेशनात रस्ते अपघातांमध्ये घट न झाल्याबद्दल लोकसभेतून भारतीयांची माफी मागितली होती. तर आता अपघात कमी करण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. दरम्यान, देशभरात 2024 या वर्षात 1 लाख 80 हजार लोकांनी रस्ते आपला जीव गमावल्याचे समोर आले आहे. ही आकडेवारी 2023 पेक्षा अधिक असून या वर्षात 1 लाख 72 लोकांचा जीव रस्ते अपघातात गेला होता. 2024 मध्ये झालेल्या अपघातांमध्ये 66 टक्के लोकांचे वय हे 18 ते 34 वर्षे असल्याचे समोर आले आहे. तर, हेल्मेट न घातल्याने दररोज 80 लोकांचा अपघातात मृत्यू होतो. देशभरात रस्ते अपघातांमध्ये दररोज 493 लोकांचा मृत्यू होतो.



Source link

Comments are closed.