रोस्टेड चिकन, स्प्रिंग ग्रीन सलाद अन् क्रीम ब्रुले तसंच राहिलं; आदेश येताच झेलेन्स्की यांना तडकाफडकी व्हाईट हाऊस सोडावं लागलं

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की खनिज करारासाठी अमेरिकेत पोहोचले होते. त्यांची अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी भेटही झाली. मात्र, ही भेट झेलेनस्की यांच्यासाठी फारशी चांगली ठरली नाही. या भेटीतच त्यांच्यात वादावादी झाली. त्यामुळे ते ज्या करारासाठी अमेरिकेत आले होते, तो करार तर झाला नाहीच, मात्र, झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले आणि त्यांच्या हॉटेलमध्ये गेले. त्यामुळे त्यांच्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये बनवलेले जेवण रोस्टेड चिकन, स्प्रिंग ग्रीन सलाद अन् क्रीम ब्रुले तसंच राहिलं, ते न जेवताच बाहेर पडले.
व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात जोरदार वादविवाद झाला. हा राजनैतिक संघर्ष युक्रेनला-अमेरिकेतील अनिश्चित संबंध अधोरेखीत करतो. या वादविवादानंतर डोनाल्ड ट्रम्प संतापले आणि झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊस सोडण्यास सांगण्यात आले. त्यामुळे झेलेन्स्कीही लगेच बाहेर पडले. त्यामुळे त्यांच्यासाठी तयार केलेले जेवण तसेच राहिले.
झेलेन्स्की खनिज करारासाठी अमेरिकेत पोहोचले होते. मात्र, त्यांच्यात आणि ट्रम्प यांच्यात वादविवाद झाला आणि तो वाढतच गेला. त्यामुळे ट्रम्प यांनी संवाद थांबवण्याची घोषणा केली आणि झेलेन्स्कीही लगेच व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले आणि त्यांच्या हॉटेलमध्ये गेले. याबाबत व्हाईट हाऊसने म्हटले आहे की झेलेन्स्की यांना निघून जाण्यास सांगण्यात आले. बैठकीनंतर युक्रेनच्या नेत्यांनी चर्चा पुन्हा मार्गावर आणण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माइक वॉल्ट्झ आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी युक्रेनियन अधिकाऱ्यांना सांगितले की, ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना ताबडतोब व्हाईट हाऊस सोडण्याचे आदेश दिले आहेत.ते ऐकताच झेलेन्स्कीही तातडीने व्हाईट हाऊसबाहेर पडले.
व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की यांच्याशी झालेल्या भेटीनंतर ट्रम्प यांनी एक निवेदन जारी केले. ट्रम्प म्हणाले की, या बैठकीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या आहेत. जोपर्यंत अमेरिका चर्चेत सहभागी आहे तोपर्यंत राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की शांततेसाठी तयार नाहीत. मला कोणचाही फायदा नको आहे, मला शांतता हवी आहे. झोलेन्स्की यांनी अमेरिकेचा अपमान केला आहे. ते खरोखर शांततेसाठी तयार असतील तरच पुन्हा चर्चा होऊ शकते आणि त्यांना पुन्हा यायचे असेल तर ते शांततेच्या चर्चेसाठीच यावे, असे व्हाईट हाऊसने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.