भाजपच्या ऑनलाईन सदस्य नोंदणीवर सायबर भामट्यांचा दरोडा, नागरिकांची फसवणूक; पदाधिकाऱ्यांची तातडीन
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="पुणे" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/pune" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">मुंबई: राज्यभरात 25 लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट साधणाऱ्या भाजपकडून मुंबईसह राज्यभरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून सदस्य नोंदणी अभियान राबवले जात आहे. पक्षातील प्रत्येक पदाधिकारी यांना सदस्य नोंदणीबाबत विशेष जबाबदारी दिली असून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. मात्र, याचाच फायदा सायबर चोरट्यांनी घेऊन आता भाजपच्या सदस्य नोंदणीच्या नावाखाली अंदाजे शेकडो नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भाजपच्या शिवडीतील एका पदाधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार दक्षिण सायबर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला असून दिल्लीतून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
दिल्लीतून पोलिसांनी एकाला अटक केली
सरबजीत सिंग असे या अटक आरोपीेचे नाव असून त्याच्याकडून दोन मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. शिवडीतील तक्रारदार भाजपच्या पदाधिकाऱ्याला 12 फेब्रुवारीच्या रात्री मोबाईलवरील सोशल मिडियावर एक व्हायरल मेसेज आला. यात भाजपच्या सदस्य नोंदणी अभियाना दरम्यान खासदार, आमदार, नगरसेवक अध्यक्ष किंवा अन्य पक्षातील पदाधिकारी यांना कमी किंमतीत रेफरल कोडद्वारे मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करून हवी असल्यास संपर्क करण्याबाबत सांगण्यात आले होते. त्यानुसार शिवडीतील पदाधिकाऱ्याने दिलेल्या मोबाईल नंबर हा व्हाॅट्स अॅप वर त्याची माहिती घेतली असता पक्षाचे नाव चिन्हासह ‘सदस्यता मोहिम सर्वेक्षण ऑनलाईन सेवा’ असे दाखवण्यात आले.
पक्षातील पदाधिकारी नागरिक यांची फसवणूक
त्याचबरोबर पुढे विश्वास पटावा यासाठी bjpsadasyata@gmail.com या ईमेल आयडीचा वापर केल्याचेही निदर्शनास आले आहे. मात्र, यामुळे पक्षातील पदाधिकारी नागरिक यांची फसवणूक केली जात असून, पक्षाची बदनामी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर शिवडीतील त्या पदाधिकाऱ्याने सायबर पोलिसात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेच्या दक्षिण सायबर पोलिसांनी बीएनएसच्या कलम 318(4) (फसवणूक) आणि 319(2) (तोतयागिरी करून फसवणूक) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(ड) आणि 74 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दिल्ली अन् छत्तीसगडमध्ये निघालं कनेक्शन
या प्रकरणी सायबर पोलिसांनी दिल्लीतून 24 वर्षीय तरूणाला 14 फेब्रुवारी रोजी अटक केली आहे. समरजीत सिंग असे या 24 वर्षीय तरुणाचे नाव असून त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने अशा प्रकारे 400 ते 500 पदाधिकाऱ्यांची अशा प्रकारे फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे. समरजीत याचे दोन मोबाईल पोलिसांनी चौकशी अंती जप्त केल्याची माहिती मिळत असून चौकशीत बिहारमधील एका 17 वर्षीय तरुणाचा सहभागही निश्चित झाला आहे. फसवणूकीसाठी जी 5 बॅक खाती वापरण्यात आली. ती या 17 वर्षीय तरुणाने पुरवल्याचा संशय पोलिसांना आहे. या मुलाची चौकशीही पोलिस करत आहेत. या दोघांच्या चौकशीतून फसवणूकीतील मास्टर माईंड हा छत्तीसगडमधील व्यक्ती असल्याचे समोर येत असून सायबर पोलिस त्याचाही शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या टोळीने अशा प्रकारे किती जणांकडून पैसे उकळले आहेत. किती आरोपींचा यात सहभाग आहे त्याचा पोलिस शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Comments are closed.