ट्रेड वॉरमुळं जगभर घबराट, इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार, कुणी दिला इशारा?

न्यूयॉर्क: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर आक्रमक धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉरमुळं अमेरिकेसह जगभरातील सर्व बाजारमध्ये चढ उतार पाहायला मिळत आहेत. भारतीय शेअर बाजारात देखील घसरण दिसून आली आहे. अमेरिकेतील बाजारातील घसरणीमुळं तिथं मंदी येण्याची शक्यता निर्माण झालीय. याचा फटका भारतीय आयटी कंपन्यांना बसला आहे. निफ्टी आयटीवरील 10 पैकी 9 कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये मोठी पडझड होत ते बेअर मार्केटमध्ये गेले आहेत. या पार्श्वभूमीवर लोकप्रिय पुस्तक  Rich Dad, Poor Dad  याचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होण्याचा इशारा दिला आहे. कियोसाकी यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

इतिहासातील सर्वात मोठी घसरण होण्याचा अंदाज

Rich Dad, Poor Dad चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी मंगळवारी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट केली. ते म्हणाले की सध्याची आर्थिक मंदी इतकी गंभीर असू शकते की त्यामुळं 1929 च्या मार्केट क्रॅश पेक्षा मोठा मार्केट क्रॅश होऊ शकतो. 1929 च्या मार्केट क्रॅशनं त्या काळी महामंदीला सुरुवात झाली होती. कियोसाकी म्हणाले, फुगा फुटत आहे, मला भीती वाटतेय की इतिहासातील सर्वात मोठी पडझड बाजारात होऊ शकते. कियोसाकी यांनी यापूर्वीच त्यांच्या पुस्तकात अशा घसरणीचा उल्लेख करु ठेवला असल्याचं म्हटलं.

कियोसाकी यांनी म्हटलं की रॉबर्ट कियोसाकी यांनी जर्मनी, जपान आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थांचा उल्लेख करत म्हटलं की अकार्यक्षम नेत्यांनी एका जाळ्यात अडकवलं आहे. त्यांनी म्हटलं की या स्थितीत चिंता व्यक्त करणं, भीती वाटणं स्वाभाविक आहे. मात्र, घाबरण्याची गरज नाही. धैर्य ठेवा, शांत राहा, दीर्घ श्वास घ्या, डोळे उघडे ठेवा आणि तोंड शांत ठेवा.

कियोसाकी यांनी पुढे इशारा दिला की लाखो लोक या  संकटात होरपळतील. मात्र, तुम्ही त्यांच्या पैकी एक होऊ नका. 2008 चं उदाहरण देत ते म्हणाले की त्यावेळी त्यांनी धैर्य ठेवलं, भीती आणि अनिश्चितता दूर होण्याची वाट पाहिली आणि मोठ्या सवलतीच्या दरात रिअल इस्टेट संपत्तीच्या खरेदीला सुरुवात केल्याचं म्हटलं.

कियोसाकींनी गुंतवणुकीच्या संधी सांगितल्या

रॉबर्ट कियोसाकी यांनी स्पष्टपणे जग कोणत्या काळातून वाटचाल करत आहे ते सांगितलं. मात्र, हीच तुमच्या जीवनातील मोठी संधी असू शकते.तम्ही धैर्य ठेवा शांत राहा, स्थिती कितीही आव्हानात्मक असली तरी शांत राहा, असं कियोसाकी म्हणाले. रॉबर्ट कियोसाकी यांनी आपली गुंतवणूक रणनीती सांगितली. त्यांनी म्हटलं की ते स्थावर संपत्ती, सोने, चांदी आणि बिटकॉईन खरेदी सुरु ठेवतील. विशेष म्हणजे कियोसाकी यांनी यापूर्वी देखील यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता.

इतर बातम्या :

सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर! गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ; प्रतितोळा सोन्याला मोजावे लागतात ‘एवढे’ पैसे

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

अधिक पाहा..

Comments are closed.