भाजपने तुषार भोसले हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय? रोहिणी खडसेंचा हल्लाबोल
जळगाव : वारकरी संप्रदायावरून राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे तुषार भोसले यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी ‘हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय?’ असा सवाल उपस्थित केला.
काही लोक वारकरी संप्रदायाचा आधार घेऊन समाजात द्वेष आणि फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वतःला ‘आचार्य’ म्हणवून घेणाऱ्यांना ही पदवी कोणी दिली, याचा तपास व्हायला हवा, अशा शब्दात रोहिणी खडसे यांनी तुषार भोसले यांच्यावर टीका केली.
Rohini Khadse On Tushar Bhosale : काय म्हटलंय रोहिणी खडसे यांनी?
खरंतर पवार साहेबांनी अशाच लबाड लांडग्यांवर टीका केली आहे. जे वारकरी संप्रदायाचं पांघरूण घालून समाजासमाजात, जातीपातीत, धर्माधर्मात तेढ निर्माण करतात. मागे एकदा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर वारकरी संप्रदायाचा आडोसा घेऊन संग्राम भंडारे नावाच्या व्यक्तीने नथुराम गोडसे होऊन थोरात साहेबांची हत्या करण्याची धमकी दिली होती.
या विचाराला वारकरी संप्रदायात स्थान नाही आणि तरीही वारकरी संप्रदायाचे नाव घेऊन कोणी द्वेष, व्याभिचार पसरवत असेल तर त्याला तिथे रोखण्याचे काम आम्ही संत मुक्ताबाई, कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे वैचारिक वारस म्हणून करू. कारण आम्ही पिढ्यानपिढ्याचे वारकरी आहोत.
भाजपने हा कोण नवीन तात्या विंचू मार्केटमध्ये आणलाय ? जो स्वतःच स्वतःला ‘आचार्य’ची पदवी लावतो. याला आचार्यची पदवी दिली कोणी याचा आधी तपास व्हायला हवा.
खरंतर @PawarSpeaks साहेबांनी अशाच लबाड लांडग्यांवर टीका केली आहे. जे वारकरी संप्रदायाचं पांघरूण घालून समाजासमाजात, जातीपातीत,… https://t.co/UXWC0MSawU
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) 11 एप्रिल 2026
Sharad Pawar Statement : शरद पवारांच्या वक्तव्याचे समर्थन
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही शरद पवार यांच्या वक्तव्याचे समर्थन केलं आहे. वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याचा मुद्दा पवारांनी मांडला होता, तो योग्य असल्याचं मिटकरी म्हणाले. पवारांनी मांडलेली 60 टक्क्यांची आकडेवारीही कमीच असून प्रत्यक्षात ही संख्या अधिक असू शकते, असा दावा मिटकरींनी केला.
Sharad Pawar On Warkari Sampraday : काय म्हणाले होते शरद पवार?
वारकरी संप्रदायात काही ठिकाणी प्रतिगामी विचारांची घुसखोरी झाल्याचं मत शरद पवारांनी मांडलं. तसंच वारकरी संप्रदायातील सुमारे 60 टक्के मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी असल्याचंही त्यांनी म्हटलं. दिल्लीत महिला शासकीय अधिकाऱ्यांचे अखिल भारतीय साहित्य संमेलन पार पडत आहे. या संमेलनाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेत शरद पवारांनी एक लेख लिहिला असून त्यामध्ये हे मत मांडण्यात आलं आहे.
ही बातमी वाचा :
आणखी वाचा
Comments are closed.