Rohini Khadse criticizes the grand alliance government for moving Foxconn project to Uttar Pradesh
उद्धव ठाकरेंचे सरकार बदलल्यानंतर फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. अशातच आता माहिती समोर येत आहे की, फॉक्सकॉन प्रकल्प उत्तर प्रदेशला हलवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधक महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहेत.
मुंबई : उद्धव ठाकरे सरकारच्या काळात फॉक्सकॉन प्रकल्प 2022 मध्ये पुण्यामध्ये होणार होता. या प्रकल्पासाठी पुण्यातील तळेगाव एमआयडीसीमध्ये जागा देण्यात आली होती. मात्र उद्धव ठाकरेंचे सरकार बदलल्यानंतर हा प्रकल्प गुजरातला गेला होता. त्यामुळे विरोधकांनी महायुती सरकारवर टीका केली होती. अशातच आता माहिती समोर येत आहे की, फॉक्सकॉन प्रकल्प उत्तर प्रदेशला हलवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विरोधक महायुती सरकारवर टीका करताना दिसत आहेत. (Rohini Khadse criticizes the grand alliance government for moving Foxconn project to Uttar Pradesh)
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी ट्वीट करताना म्हटले की, महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला आहे. प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 हजार 706 कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून उत्तर प्रदेशातील 2 हजार नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. आधी महायुती सरकारने महाराष्ट्राच्या हक्काचे गुजरात देऊन गुटगुटीत केले, आता उत्तर प्रदेशला पुरवले जात आहे. एक काळ होता लोक महाराष्ट्रात लोक रोजगारासाठी यायचे. पण आता आपल्या मराठी मुलांनी गुजरात, उत्तर प्रदेशात जाऊन नोकऱ्या कराव्या, असं सरकारला वाटत आहे का? असा प्रश्न रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा – Maharashtra Police : आता पोलीस हेड कॉन्स्टेबलही करणार गुन्ह्यांचा तपास; फक्त काही अटी पूर्ण कराव्या लागतील
महाराष्ट्रात येणारा फॉक्सकॉनचा सेमिकंडकटरचा प्रकल्प आता उत्तर प्रदेशात गेला आहे. प्रकल्पासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ३ हजार ७०६ कोटींच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातून उत्तर प्रदेशातील २ हजार नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.
आधी महायुती सरकारने… https://t.co/35NJz54kAt
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) May 15, 2025
फॉक्सकॉन प्रकल्प जेवर विमानतळाच्या जवळ उभारणार
फॉक्सकॉन प्रकल्प हा महाराष्ट्र आणि गुजरातनंतर आता उत्तर प्रदेशला मिळाला आहे. या प्रकल्पांतर्गत 2 हजार नागरिकांना काम मिळणार आहे. केंद्र सरकारने फॉक्सकॉनचा सहावा सेमी कंडक्टर प्लॅट बनवण्यासाठी मंजूरी दिली. 3706 कोटींची गुंतवणूक असलेला हा प्रकल्प उत्तर प्रदेशच्या यमुना एक्सप्रेसवे इंडस्ट्रीयल झोनमध्ये जेवर विमानतळाच्या जवळ उभारण्यात येणार आहे. 2027 पासून या प्रकल्पातून उत्पन्न सुरू होण्याची शक्यता आहे. प्रत्येक महिन्याला 3.6 कोटी डिस्प्ले ड्राईवर चिपचे उत्पादन होणार आहे. ही चिप मोबाइलच्या डिस्प्लेसाठी आवश्यक असते.
हेही वाचा – Maharashtra Politics : …तर मला आणि आंबेडकरांनाही एकत्र यावे लागेल, आठवलेंच्या वक्तव्याने खळबळ
Comments are closed.