अजितदादांनी मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी लहान माशाचा बळी दिला, सूरज चव्हाणच्या राजीनाम्या
सूरज चवानवर रोहिणी खडसे राजीनामा: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा विधीमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा व्हिडीओ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर शेअर केला होता. यावरून अखिल भारतीय छावा संघटनेने रविवारी लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या समोर तीव्र संताप व्यक्त केला. ‘छावा’ संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांच्या समोर प्रतिकात्मक निषेध म्हणून पत्ते उधळले होते. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणने (Suraj Chavan) ‘छावा’च्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. तर या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुरज चव्हाणला राजीनामा देण्याच्या सूचना केल्या. यानंतर सूरज चव्हाणने राजीनामा दिल्याची माहिती सुनील तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. आता सूरज चव्हाणच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
अजितदादांनी लहान माशाचा बळी दिला : रोहिणी खडसे
रोहिणी खडसे यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या बेलगाम झालेल्या युवक प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा घेतला ही स्वागतार्ह बाब आहे. पण त्यांनी दुधाची भूक ताकावर भागवण्यासारखा प्रकार करू नये. मोठ्या लाडक्या माशाला वाचवण्यासाठी फक्त लहान माशाचा बळी देऊन चालणार नाही. अजितदादांनी मस्तवाल कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचाही राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे. कारण हे प्रकरण त्यांच्यापासूनच सुरू झाले. त्यामुळे बेजबाबदार, सभागृहाचा, शेतकऱ्यांचा अवमान करणाऱ्या मंत्र्यांचाही राजीनामा घ्यायला हवा, अशी मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
शिंदे गटाच्या प्रवक्त्याचा सूरज चव्हाणला इशारा
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते योगेश केदार यांनी सूरज चव्हाण यांना थेट इशारा दिलाय. त्यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट करत म्हटले आहे की, सूरज चव्हाणने दिलगिरी व्यक्त केली. पण, आधी मारायचे अन् दिलगिरी व्यक्त करून पांघरून घालायचे ही अनीती सुरू झालीय. सूरज चव्हाणला जर आज धडा शिकवला नाही तर उद्या कुणीही उठून मराठा कार्यकर्त्याना मारतील. हिसाब बराबर होगा, असा इशारा त्यांनी सूरज चव्हाणला दिला आहे.
https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.