… तर सामान्य लोकांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिनी खडसे यांचा चित्रा वाघ यांना सवाल
इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे देशभरात इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. सिलेंडर गॅस उपलब्ध नसल्यामुळे गॅस एजन्सीच्या बाहेर लोकांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. सिलेंडरच्या तुटवड्याचे पडसाद दिल्लीतील संसदेपासून महाराष्ट्राच्या विधानभवनातही दिसले. शुक्रवारी अधिवेशनाच्या वेळी काँग्रेसचे वरिष्ठ नेते विजय वडेट्टीवार व नाना पटोले हे सिलेंडरच्या तुटवड्याविरोधात आंदोलन करत होते. त्यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ तिथे आल्या व त्यांनी ‘सिलेंडर उपलब्ध आहे, 25 दिवसात मिळते सिलेंडर’, असे सांगितले. तो व्हिडीओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रोहिनी खडसे यांनी त्यांना खडे बोल सुनावले आहेत.
”गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना वि’चित्रा’ ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले. वि’चित्रा’ ताई म्हणाल्या की, सिलिंडर आहेत, 25 दिवसात मिळते सिलिंडर. बुक करायला सांगा. अहो विचित्रा ताई, जर एका सामान्य गृहिणीच्या घरचा गॅस, आज संपला असेल तर त्यांनी काय करावं? २५ दिवस वाट पहावी का? बरं पाहतो वाट! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का ? वि’चित्रा’ ताई ? असा सवाल रोहिणी खडसे यांनी केला.
Comments are closed.