रोहिणी खडसे आणि प्रांजल खेवलकरांचं लग्न कसं जमलं? नाथाभाऊ लेकीच्या निर्णयावर काय म्हणाले होते?
रोहिणी खदसे आणि प्रांजल खेवलकर: पुण्याच्या खराडी परिसरात शनिवारी रात्री पोलिसांनी एका फ्लॅटवर छापा टाकला होता. या फ्लॅटमध्ये रेव्ह पार्टी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. पोलिसांनी या फ्लॅटमधून पाच पुरुष आणि दोन महिलांना ताब्यात घेतले होते. यामध्ये ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा समावेश होता. प्रांजल खेवलकर (Pranjal Khewalkar)) यांना पोलिसांनी अटक केल्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या सगळ्या घटनेनंतर रोहिणी खडसे यांनी ट्विट करुन, ‘कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. (Pune crime Rave Party news)
या सगळ्या घटनाक्रमानंतर रोहिणी खडसे आणि त्यांचे पती प्रांजल खेवलकर हे सध्या प्रचंड चर्चेत आले आहेत. रोहिणी खडसे यांनी ‘लगाव बत्ती’ या यू-ट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लग्नाना किस्सा सांगितला. त्यांनी म्हटले की, ‘बाबांनी तिन्ही भावांनाही मोकळीक दिली होती, तुम्ही जोडीदार शोधून आणू शकता, पण फायनल आम्ही करु. त्यांनी मलाही लग्नाला परवानगी दिली. मी आणि प्रांजल आम्ही शाळेतील मित्र आहोत. आम्ही दहावीलाही सोबत होतो. जेव्हा मी बाबांना सांगितलं की, मला याच्याबरोबर लग्न करायचं आहे, तेव्हा बाबांनी आम्हाला परवानगी पण दिली. सध्या आम्ही दोघे चांगल्या पद्धतीने संसार करत आहोत. नंतर बाबाही म्हणाले, तुझा निर्णय बरोबर होता.माझा नवरा प्रांजल आणि आमच्या कुटुंबीयांचे फार जुने संबंध आहेत. ते पण मूळचे मुक्ताईनगरचे आहेत. त्यामुळे आमच्या दोघांच्या घरातील लोक एकमेकांना फार चांगल्या रितीने ओळखतात. त्यामुळे प्रांजलशी लग्न करायचं ठरवल्यानंतर नवीन असं काही नव्हतं. आमचा बघण्याचा किंवा कांदेपोह्यांचा कार्यक्रम झाला नाही, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले. माझ्या सासरी आठ जणांचं कुटुंब आहे. त्यामध्ये माझ्या सासूबाई, दीर-जाऊ आणि एक छोटीशी पुतणी आहे, असेही रोहिणी खडसे यांनी म्हटले.
Pranjal Khewalkar news: माझा नवराच माझ्यासाठी साड्या विकत आणतो: रोहिणी खडसे
मी खरेदीसाठी फारवेळा दुकानात जात नाही. त्यामुळे प्रांजलच माझ्यासाठी साड्या घेऊन येतो. त्याला माहिती आहे की, ही काही साड्या घ्यायला दुकानात जाणार नाही. त्यामुळे प्रांजलला कुठे चांगल्या साड्या वाटल्या तर तो माझ्यासाठी घेऊन येतो. त्याला खाण्याचाही शौक आहे. त्यामुळे तो मला बऱ्याचदा जेवणासाठी रेस्टॉरंटला घेऊन जातो. मात्र, मला घरचंच जेवण जास्त आवडतं, असे रोहिणी खडसे यांनी सांगितले.
https://www.youtube.com/watch?v=SEMFSO1RIC8
आणखी वाचा
इमोशनल ब्रेकडाऊन, हातावरचा टॅटू, रोहिणी खडसे अडचणीतून बाहेर कशा पडल्या?
आणखी वाचा
Comments are closed.