मुख्य प्रशिक्षकांच्या निर्णयामुळे रोहित, विराटसह या दिग्गजाला निवृत्ती घ्यावी लागली? माजी खेळाडूने गौतम गंभीरवर साधला निशाणा

भारतीय माजी फलंदाज मनोज तिवारी (Manoj Tiwari) आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांच्यात नेहमीच काहीसा तणाव राहतो. हे तिवारीच्या विधानांतून स्पष्ट होते. बंगालसाठी खेळणारे मनोज तिवारी यांनी पुन्हा गंभीर यांच्यावर टीका केली आहे. तिवारी म्हणाले की, गंभीरच्या वातावरणामुळेच रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विनला क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घ्यावा लागला.

तिवारी म्हणाले, जर सीनियर खेळाडू आणि अश्विन, रोहित सारखे अनुभवी खेळाडू संघात असतील, तर त्यांना आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. पण जर हे खेळाडू काहीतरी मान्य करत नाहीत, तर संघाने आधीच हे निश्चित केले पाहिजे की हे खेळाडू संघात नाहीत.

त्यांनी पुढे सांगितले, प्रशिक्षक गंभीर पदावर आल्या नंतर अनेक वाद झाले आहेत. हे वाद भारतीय क्रिकेटसाठी चांगले नाहीत. गंभीर आले तेव्हापासून अश्विनने निवृत्ती घेतली, रोहित आणि विराटने देखील निवृत्ती घेतली. काहीवेळा खेळाडूंना अचानक संघात सामील केले जाते आणि थेट खेळवले जाते. गंभीर स्थिर राहिलेले नाहीत.

माजी फलंदाज म्हणाले, सध्याचे वातावरण खेळाडूंवर खूप दबाव आणत आहे. रोहित आणि विराट भारतीय क्रिकेटसाठी नेहमीच मोलाचे राहिले आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीने संघाला खूप दिले आहे. जर खेळाडूंना वाटत असेल की, परिस्थिती त्यांच्या प्रतिमेला हानी पोहोचवत आहे आणि ड्रेसिंग रूममध्ये त्यांची गरज नाही, तर ते निवृत्ती घेण्याचा विचार करू शकतात.

Comments are closed.